आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेस्ट सर्जरी करून घरी परतलेल्या महिलेला आली चक्कर, उपचारादरम्यान झाला मृत्यू; डॉक्टरांनी दिले धक्कादायक कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - सौंदर्याच्या प्रत्येकाच्या आप-आपल्या संकल्पना आहेत. गर्दीत सर्वात वेगळे आणि आकर्षक दिसण्याच्या नादात लोक बॉडी मॉडिफिकेशनला पसंती देतात. विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करून शरीराचे अंग वाढवतात किंवा त्यांना हवे तसे आकार देण्याचा प्रयत्न करतात. याच नादात केवळ पैशेच नव्हे, तर काहींना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. त्याचेच आणखी एक उदाहरण ब्रिटनमध्ये समोर आले आहे. येथील एका महिलेने सौंदर्यासाठी ब्रेस्ट सर्जरी केली. सर्जरीच्या 17 व्या दिवशी ती अचानक घरात चक्कर येऊन कोसळली. श्वासात अडथळा येत असल्याने तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. 


तीन मुलांची आई होती महिला...
ब्रिटनमध्ये एक ब्युटी थेरेपिस्ट असलेली लुइस हार्वे (36) हिने आपले सौंदर्य वाढवण्यासाठी स्तनांचा आकार वाढवण्याचा निर्णय घेतला. तीन मुलांची आई असलेल्या लुइसने याच वर्षी जून महिन्यात तिने लंडनच्या एका क्लिनिकमध्ये ब्रेस्ट सर्जरी केली. या सर्जरीवर खुश होऊन तिने सुरुवातीला आपले काही फोटो सोशल मीडियावर अपलोड देखील केले. मात्र, सर्जरीच्या ठीक 17 दिवसांनंतर तिला श्वास घेण्यात अडथळा निर्माण झाला आणि ती चक्कर येऊन पडली. तिला वेळीच नॉरफोक येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरू असताना 5 जुलै रोजी तिचा मृत्यू झाला. 


सर्जरीनंतर स्तनांमध्ये आली होती रक्ताची गाठ
तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या स्तनांत सर्जरीनंतर रक्ताची गाठ तयार झाली होती. यामुळेच तिला श्वास घेण्यात अडथळे निर्माण झाले. शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा कमी होणे आणि इतर इन्फेक्शनमुळे तिचा जीव गेला. 


कोर्टात याचिका दाखल
लुइस तीन मुलांची सिंगल मदर होती. तिच्या सर्वात मोठ्या असलेल्या मुलीचे वय 18 वर्षे, यानंतर 11 वर्षांचा मुलगा आणि 6 वर्षांचा दुसरा मुलगा आहे. या सर्वांचा सांभाळ करण्यासाठी आता कुणीही उरलेले नाही. लुइसच्या मित्र-मैत्रिणी त्यांची काळजी घेत आहेत. त्यांनीच कोर्टात सर्जरी क्लिनिकच्या विरोधात नुकसानभरपाईचा खटला दाखल केला. तसेच तिच्या मुलांना मदत मिळवून देण्यासाठी एक फेसबूक पेज देखील तयार केला आहे. तिच्या याचिकेवर मार्च महिन्यात सुनावणी घेतली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...