आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पोर्ट डेस्क- वेस्टइंडीजचे माजी कर्णधार ब्रायन लाराने लोकेश राहुल आपला आवडता खेळाडू असल्याचे सांगितले आहे. लारा यांनी सांगितल्यानुसार, राहुलकडे कमालीची शैली आहे. लाराने राहुलला कसोटी संघात जागा न मिळाल्याचे आश्चर्य व्यक्त केले आहे. राहुल सोबत लाराने विराट कोलहीसाठी आपल्या मनात खूप सन्मान असल्याचे सांगितल आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाला आपल्या घरच्या मैदानावर फायदा होईल, पण भारत आणि वेस्ट-इंडिज त्यांना कडवे आव्हान देतील, असा विश्वासही लाराने बोलून दाखवला.
...माझ्याकडेही राहुलसारखी शैली असायला हवी होती
ईसपीएनक्रिकइन्फो वेबसाइटला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये लाराने टीम इंडियाच्या नुकत्याच झालेल्या न्यूझीलँड दौऱ्यावर भाष्य केले. ते म्हणाले की, भारतीय टीम परिस्थितीनुसार बदल करू शकली नाही. पण, जास्त परेशान होण्याची गरज नाही. यादरम्यान लाराने लोकेश राहुलवर विशेष चर्चा केली. म्हणाले, “सध्या राहुल माझे आवडते खेळाडू आहेत. त्यांना खेळताना पाहण्यासारखा दुसरा आनंद नाही. त्यांची शैली कमालीची आहे. माझ्याकडेही अशी शैली असायला हवी होती.”
कसोटी संघात राहुलला का जागा नाही ?
पुढे लारा म्हणाले की, “राहुलच्या शैलीत कोणतीच कमतरता नाही. त्यांची हेड पोझिशन खूप चांगली आहे. मला आश्चर्य वाटत आहे की, त्यांना भारताच्या कसोटी संघात जागा दिली नाही. राहुल सर्वच फॉर्मेटमध्ये चांगली कामगिरी करतो. त्याला टेस्टमध्ये घ्यायला हवे होते.”
तीन खेळाडूंचे कौतुक
लारा यांना विचारले की, राहुलशिवाय त्यांना इतर कोणत्या खेळाडुचा खेळ आवडतो. यावर ते म्हणाले की, “विराट कोहलीचा खेळ मला आवडतो. माझ्या मनात त्याच्याबद्दल खूप सन्मान आहे. रोहित शर्माची फलंदाजी पाहणे एक वेगळाच अनुभव देते. रोहीतने एकाच विश्वचषकात पाच शतक ठोकले. वेस्ट इंडीजबद्दल बोलायचे झाले तर, निकोलस पूरन चांगली कामगिरी करत आहे.”
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.