आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या दिवशी नवरीने आपल्या मित्रांना केली 'ही' अजब डिमांड, ऐकून दंग झाले मित्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटन - लग्नाचा दिवस मुलीसाठी सर्वात खास असतो. त्या दिवशी ती एखाद्या महाराणीसारखी असते. कुटुंबीय तिचा प्रत्येक शब्द झेलतात. परंतु ब्रिटनमध्ये एका 19 वर्षीय तरुणीने लग्नाच्या काही दिवसांपूर्वीच आपल्या मित्रांकडे अशी डिमांड केली की, जी ऐकून सर्व हैराण झाले. वास्तविक, या तरुणीने सोशल मीडियावर आपल्या मित्रांना म्हटले की, तिच्या लग्नात चांगले कपडे घालून येऊ नये.

 

का म्हणाली असे...
- वास्तविक, क्रिस्चियन रीतिरिवाजानुसार लग्नाच्या दिवशी नवरीसोबत चालणाऱ्या महिलांना ब्राइड्स मेड म्हटले जाते. त्या  दिवसभर वाग्दत्त वधूच्या सोबतच राहतात.

- साधारणपणे नवरीची मैत्रीण वा कुटुंबातील महिलाच ब्राइड्स मेड बनतात. या तरुणीने त्यांच्याच साठी लिहिले की, त्या दिवशी जास्त सजूनधजून येऊ नका, आणि चांगले कपडेही घालू नका. जेव्हा तिच्या एका मैत्रिणीने यामागचे कारण विचारले तेव्हा तिने लिहिले की, माझ्या लग्नाच्या दिवशी फक्त मीच सुंदर दिसले पाहिजे. माझ्यापेक्षा इतर कोणी सुंदर दिसलेले मला आवडणार नाही.''

 

कॉमेंट्स वाचून भडकले लोक
- या तरुणीची विचित्र डिमांड वाचून काही लोक भडकले. काहींनी तिला मतलबी आणि स्वार्थी म्हटले. तर काहींना वाटले की, ती मस्करी करत आहे. परंतु तरुणी म्हणाली की, तिने मनापासूनही ही गोष्ट लिहिली होती. हेच खरं आहे. या पोस्टवर तिच्या एका मैत्रिणीने तिला सपोर्ट करत लिहिले, ''मी तुझ्या भावना समजू शकते. मीही या काळातून गेले आहे. आम्ही पूर्ण प्रयत्न करू की, त्या दिवशी सर्वांच्या नजरा फक्त आणि फक्त तुझ्यावरच राहतील.

 

बॅचलर पार्टीतही होता स्ट्रिक्ट ड्रेस कोड
- हद्द तर तेव्हा झाली जेव्हा या तरुणीने सांगितले की, तिच्या बॅचलर पार्टीत तिने अशा प्रकारची बंदी आपल्या मैत्रिणींवर लावली होती. तिने स्पष्टपणे सांगितले होते की, तिच्याशिवाय इतर कोणीही अंगप्रदर्शन करणार कपडे घालता कामा नये. एवढेच काय, बॅकलेस ड्रेसवरही तिने बॅन लावला होता.

 

लोक म्हणाले- पागल
- या तरुणीची पोस्ट वाचून काहींनी तिची थट्टा सुरू केली. काही म्हटले की, तिचे मानसिक संतुलन ढळले आहे. तर काहींनी म्हटले की, ती स्वत:ला इनसिक्योर मानते आणि तिला इतरांचा मत्सर वाटतो. 

 

 

बातम्या आणखी आहेत...