आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवटचा फेरा घेण्याआधी MA पास नवरीने ठेवली अनोखी अट, अडून बसली आणि म्हणाली- अट पूर्ण झाली तरच घेईन फेरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दौसा (राजस्थान) - येथे नवविवाहित जोडप्याने आपल्या लग्नात अनोखा पुढाकार घेत सर्वांना चकित केले. लग्नाच्या सर्व विधी पूर्ण झाल्यावर अचानक एम.ए. पास असलेल्या नववधूने लग्नमंडपात सुरू असलेल फेरे रोखले. शेवटचा फेरा घेण्याआधी रेल्वेत कार्यरत पती ताराचंद बैरवाला तिने आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा संकल्प केल्यावरच अंतिम फेरा घ्यायचा हट्ट धरला. 

 

अचानक बदलले लग्नमंडपातील वातावरण
वधूच्या या अचानक पवित्र्यामुळे मंडपात निराशा पसरली. तेथे उपस्थित वर आणि वधूपक्षाची मंडळी एकमेकांकडे पाहू लागली. वधूला सर्वांनी तिची नेमकी मागणी काय हे विचारल्यावर ती म्हणाली की, लग्नानंतर पतीने तिला मतदानासाठी जाऊ द्यावे. ही अट ऐकताच मंडपात एकच हशा पिकला. यावर नवरदेवानेही स्वत:ची एक मागणी ठेवली. नवरदेवाने वधूला वचन देण्याची मागणी केली. यामुळे पुन्हा तणाव वाढला. नवरदेव म्हणाला, नवरीने ही एक प्रतिज्ञा घेतली तरच शेवटचा फेरा घेणार. 

 

नवरेदव ताराचंद बैरवाने लग्नमंडपात पत्नी रिंकी बैरवाला आपल्या लग्नात आलेले कोणतेही सामान किंवा हुंड्यातील एकही वस्तू आपल्यासोबत न घेण्याची प्रतिज्ञा घ्यायला सांगितली. असे केले तरच फेरे पूर्ण करू असे म्हणाला. वर-वधूच्या या अजब पवित्र्यामुळे दोन्ही बाजूंची मंडळी हतप्रभ ठरली.

 

पतीचा संकल्प, तर पत्नीची प्रतिज्ञा 
अंतिम फेरे घेण्याआधी पती ताराचन्द बैरवाने पत्नी रिंकीला डिसेंबरमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी स्वत: घेऊन जाण्याचा संकल्प केला. दुसरीकडे, पत्नी रिंकीनेही हुंड्यातील एकही वस्तू सोबत न घेण्याची प्रतिज्ञा घेतली. तेव्हा कुठे लग्नाचे सर्व विधी यथासांग पार पडले. 

 

बातम्या आणखी आहेत...