Home | International | Other Country | bride lets her guest touch her as they want in a weird wedding in China

लग्नात आलेल्या पाहुण्यांना वधू म्हणाली - मला कुणीही, कसेही करू शकता स्पर्श; अट फक्त एवढीच...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 09, 2018, 12:03 AM IST

तिला टच करणाऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश होता.

 • bride lets her guest touch her as they want in a weird wedding in China

  बीजिंग - जगभरात होणाऱ्या लग्नांमध्ये विविध प्रकारच्या प्रथा आणि परंपरा पाळल्या जातात. त्यापैकी काही इतक्या विचित्र आहेत की त्याची आपण कल्पनाही करू शकणार नाही. विवाहात सर्वात विचित्र पद्धतींसाठी चीन कुप्रसिद्ध आहे. या ठिकाणी होणाऱ्या लग्नात विवाहितेला कसा त्रास द्यायचा हाच विचार पाहुणे आणि नातेवाइक करत असतात. अनेकवेळा यात अश्लीलतेच्या सीमा ओलांडल्या जातात. परंतु, एक लग्न असाही झाला जेथे खुद्द वधूने जाहीरपणे आलेल्या पाहुण्यांना खुशाल कसेही टच करण्याची सूट दिली. यासाठी तिने एक अट देखील ठेवली. तरीही तिची अट मान्य करणाऱ्यांना चक्क रांगा लावल्या.


  काय होती घोषणा
  चीनमध्ये पार पडलेला हा अजब विवाह सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तरुणीने पाहुणे आपली छेड काढतील त्यापूर्वीच स्वतःच एक घोषणा केली. लग्न समारंभ सुरू असताना अचानक वधूने हातात माइक घेतला. लग्नात आलेल्या पाहुणे समोर येऊन मला वाट्टेल तेथे स्पर्श करू शकतात. वाटल्यास कपडे हटवून सुद्धा टच करता येईल. परंतु, हे करत असताना एक अट पूर्ण करावी लागेल असे तिने जाहीर केले. अटीनुसार, कुणीही तिला टच करू शकतो. पण त्यासाठी पैसे द्यावे लागतील. तिची ही घोषणा ऐकूण अटीवर सर्वांनीच दुर्लक्ष केले आणि तिला टच करण्यासाठी रांगा लावल्या. स्पर्श करून पैसे देणाऱ्यांमध्ये केवळ पुरुषच नव्हे, तर महिलांचाही समावेश होता. पाहता-पाहता वधूकडे पैशांचा ढीग लागला.


  यासाठी गोळा केले पैसे
  वधू आणि वराने मिळूनच हा अजब निर्णय घेतला होता. प्रत्यक्षात, वधू आणि वराची आर्थिक परिस्थिती कमकुवत होती. लग्नात खर्च करण्यासाठी सुद्धा त्यांनी पै-पै जोडले होते. अशात हनीमून साजरा करण्यासाठी त्यांच्याकडे काहीच उरलेले नव्हते. त्यातच चीनमध्ये वधूंची छेड काढण्याची परंपराच असल्याने त्यामध्ये लाजण्यासारखे काहीही नव्हते. अशा प्रकारे त्यांनी आपल्या हनीमून डेस्टिनेशनची प्लॅनिंग केली.

Trending