आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाची तयारी झाली अन् अचानक मांडवात येऊन धडकली नवरदेवाची प्रेयसी; दोघीही म्हणाल्या आम्हाला याच्यासोबतच लग्न करायचे... मग घडले असे काही...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दंतेवाडा - सामुहिक विवाह सोहळ्यात एका पेक्षा अधिक जोडप्यांनी सात फेरे घेतल्याचे ऐकले असेल पण एकाच नवरदेवाने दोन वधूंसोबत सात फेरे घेतल्याचे ऐकले नसेल. मुचनार गावात असेच एक अनोखे लग्न झाले. येथे नवरदेव बीरबल नागने दोन सुमनी आणि प्रतिभा या दोन मुलींसोबत लग्न केले. या लग्नाचे वैशिष्ट म्हणजे दोन्ही मुलींच्या संमतीने संपूर्ण समाजासमोर हल्बा समाजाच्या पारंपरिक प्रथेनुसार हे लग्न पार पडले. या विवाह सोहळ्यात सामाजातील लोक आणि नातेवाईक सहभागी झाले होते. 


सुरुवातीला लिव-इन मध्ये राहिले नंतर वेगळे झाले
बीरबल आणि सुमनी एकमेकांना पसंत केले होते. दोघेही सोबत राहत होते. पण सामाजिक रूढी-परंपरेनुसार त्यांचे लग्न झाले नव्हते. काही महिन्यांनी सुमनी माहेरी निघून गेली. तिने परत येण्यास नकार दिला. यानंतर दोन वर्षांनी बीरबलने प्रतिभाला लग्नासाठी तयार केले आणि प्रतिभा बीरबलच्या घरी राहू लागली. काही दिवसांनी त्यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. 


लग्नात पोहोचली प्रेयसी तेव्हा समोर आले प्रकरण

दरम्यान सुमनी परत आली आणि पतीसोबत राहण्याची इच्छा वर्तवली. यामुळे हे प्रकरण पोलिसांत गेले. तेथे सल्लामसलत झाल्यानंतर दोघींनी एकाच पतीला स्वीकारण्यास होकार दिला. समाजातील प्रमुखांनी देखील या लग्नाला मंजुरी दिली आणि शनिवारी समाजाच्या रूढी-परंपरेनुसार दोघांचे लग्न पार पडले. 

 

सासरे म्हणाले - घरात शांती नांदावी याशिवाय चांगली गोष्ट काय असू शकते. 
नवरदेवाचे वडील चन्नी राम यांनी मुलाच्या निर्णयावर आनंद व्यक्त करत सांगितले की, 'घरात सुख-शांती नांदावी याशिवाय चांगली गोष्ट काय असू शकते.' जिल्हा हलबा सोसायटीचे कायदेशीर सल्लागार हरिलाल दगल म्हणतात की हे एक अनोखे प्रकरण आहे. आतापर्यंत अशा लग्नाविषयी कधीच ऐकले नव्हते.