आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासागर - लग्न करून जिला अर्धांगिणी बनवून घरात आणले ती आपल्यासोबत इतका मोठा विश्वासघात करेल याचा विचार ओमप्रकाशने स्वप्नातही केला नव्हता. याच महिन्याच्या सुरुवातीला ओमप्रकाशचा विवाह एका नातेवाइकाच्या ओळखीने झाला होता. जिला ते सामान्य गरीब घरातील संस्कारी मुलगी समजत होते, ती प्रत्यक्षात एक प्रोफेशनल चोर निघाली. तिसऱ्याच दिवशी ती अख्ख्या कुटुंबाला बेशुद्ध करून दागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाली. लग्न झाल्यानंतर सलग दोन दिवस पत्नी लवकर झोपली. या दोन दिवसांत नवरदेवाला आपल्या पत्नीवर थोडीही शंका आली नाही. तिसरा दिवस उगवला तोपर्यंत खूप उशीर झाला होता. 13 मार्च रोजी घरातील सगळेच बेशुद्ध असल्याचे पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले आणि संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला.
ही घटना मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा घरातील सासू, सासरे, नवरदेव आणि दीर हे चौघेही बेशुद्ध होते. घरातील सर्वच साहित्ये अस्त-व्यस्त पडली होती. तीन दिवसांपूर्वीच घरात आलेल्या वधूचा काही पत्ता नव्हता. कुटुंबियांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही वेळातच त्यांना शुद्ध आली. पोलिसांसोबत घरात जाऊन हिशोब लावला तेव्हा लाखो रुपयांचे दागिने आणि घरात ठेवलेला हजारोंचा रोकड गायब होता. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा नववधूने आपल्या सासरच्या सर्वच सदस्यांना भूलचे औषध धेऊन बेशुद्ध केले आणि घरातून लाखोंचा मुद्देमाल घेऊन फरार झाली.
वधूचे नाव सुद्धा कुणालाच माहिती नाही
भरतलाल यादव यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, माझा मेहुणा बलबीर सिंह यादवने 60 हजार रुपये चंद्रपालला देऊन आपला भाऊ ओम प्रकाशसोबत एका तरुणीचा विवाह जमवला. 10 मार्च रोजी त्याचा विवाह झाला. परंतु, लग्नाच्या तिसऱ्या दिवशी तरुणीने आपला सासरा, सासू, दीर आणि पतीला गुंगीचे औषध दिले आणि सर्वच साहित्य लुटून पळून गेली. ज्या तरुणीशी ओम प्रकाशचा विवाह झाला तिचे नेमके नाव काय होते याचा देखील कुटुंबियांना पत्ता नाही. खरे नाव माहिती नसल्याने पोलिसांना सुद्धा तपासात अडचणी येत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.