आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुचंद्राच्या रात्री पत्नीने ठोकरले, म्हणाली- दाढी-मिशावाला नको, जीन्सवाला मॉडर्न पाहिजे पती!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवविवाहित जोडपे. - Divya Marathi
नवविवाहित जोडपे.

छछरौली (हरियाणा) - मधुचंद्राच्या रात्री पत्नी म्हणाली की, तिला दाढी-मिशा अन् कुर्ता-पायजामावाला पती नको, तर जीन्स-शर्ट घालणारा मॉडर्न पती पाहिजे. यामुळे आता सोबत राहणे शक्य नाही. ही घटना हरियाणाच्या छछरौली परिसरातील आहे.

 

असे आहे प्रकरण

मलिकपूर खादरचा रहिवासी गुलफामने स्वप्नातही विचार केला नव्हता की, 8 महिन्यांपूर्वी जे स्थळ पसंत केले, राजीखुशीने निकाह केला, त्या मुलीनेच सुहागरातीच्या दिवशी ठोकरले. गुलफामने तिची समजूत घातली की, मी बदलण्याचा प्रयत्न करीन. परंतु मधुचंद्राच्या रात्रीच पत्नी त्याला सोडून आपल्या भावांसोबत माहेरी निघून गेली.

 

9 तारखेला लग्न, 10 लाच पळून गेली पत्नी

उल्लेखनीय म्हणजे गुलफामचे लग्न 9 सप्टेंबर रोजी झाले होते आणि 10 तारखेलाच ती पळून गेली. गुलफामच्या पत्नीचे दागिने व रोख रक्कम घेऊन फरार झाल्याप्रकरणी अनेक नवीन खुलासे झाले आहेत. त्याने सांगितले की, 8 महिन्यांपूर्वी दोन्ही कुटुंबांनी त्यांचे लग्न पक्के केले. त्यानंतर कुटुंबीयांच्या राजीखुशीने निकाह झाला. सुहागरात्रीच्या दिवशी नवरीने नवरदेवाला पाहताच त्याच्यासोबत राहण्यास स्पष्ट नकार दिला.

 

म्हणाली- सासरचे जुन्या विचारांचे असतील, हे माहिती नव्हते
पीडित पती गुलफामने सांगितले की, त्याची पत्नी म्हणाली की, तिला दाढी ठेवणारे आणि साधारण कपडे घालणारे बिलकूल पसंत नाहीत. नवरीचे म्हणणे होते की, ती शिकलेली आहे. आणि ज्या वातावरणात ती वाढली आहे तिथे मॉडर्न वातावरण आहे. यामुळे येथे राहू शकत नाही. तिचे नातेवाइकही सर्व मॉडर्न लाइफस्टाइल जगतात. नवरी म्हणत होती की, तिला माहिती नव्हते की, ज्या जागेवर लग्न होत आहे, ते घर आणि लोकं जुनाट विचारांचे असतील.

 

पत्नीची घातली होती समजूत
सगळे बोलणे ऐकल्यानंतर गुलफामने आपल्या नवविवाहित नवरीची खूप समजूत घालण्याचा प्रयत्न केला. म्हणाला की, आता झाले ते झाले. याच वातावरणात राहण्याची सवय कर. मीसुद्धा हळूहळू माझे राहणीमान बदलण्याचा प्रयत्न करतो. समजूत घातल्यानंतरही तिने तिचा निर्णय बदलला नाही. त्या रात्री गुलफाम या अपेक्षेने झोपला की, बहुधा सकाळपर्यंत त्याचे म्हणणे तिला पटेल. परंतु जेव्हा सकाळी जाग आली तेव्हा नवरी गायब होती.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...   

 

बातम्या आणखी आहेत...