आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार घालण्यासाठी स्टेजवर आले होते वर-वधु, काहीतरी चुकीचे होत आहे लक्षात आल्यावर वधुने केला पोलिसांना फोन...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भागलपूर- दारू विरोधात एका मुलीने सगळ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. दारू पियून आलेल्या नवऱ्याला या मुलीने लग्न करण्यास नकार दिला. गुरूवारी पोलिस कॉन्सि्टीबल उदय सिंहची वरात सुल्तानगंजच्या अकबरपूर आली होती. वधुने स्वत: पोलिसांना कॉल करून बोलवले. पोलिसांनी वर आणि त्याच्या वडिलांना अटक केले, त्यानंर वरातही परत गेली. 


दोन्ही कुटुंबात झाली हाणामारी
युवतीने सांगितले, नवऱ्यासोबतच इतर लोकही दारू पिऊन आले होते. जेव्हा वरात मुलीच्या घराबाहेर आली तेव्हा डीजेवर डान्स करण्यावरून वराती आणि मुलीकडच्या लोकांत मारामारी झाली, ज्यात मुलाचे मामा, आजोबा आणि वडील राजकिशोर जखमी झाले. कसेबसे प्रकरण शांत केले आणि लग्न हार घालण्यापर्यंत आले. स्टेजवर येताच नवऱ्याच्या तोंडातून आणि शरीरावरून दारूचा वास येत होता आणि त्याचे मित्रही इकडे तिकडे पडत होते. मी विचार केला की, आताचा काही केले नाही तर आयुष्यभर पश्चाताप करत बासावा लागेल. मी कोणालाही काही न सांगता गुपचूप पोलिसांना फोन केला आणि सगळे प्रकरण सांगितले. पोलिस येताच इतर दारू पिलेले लोक पळून गेले.


दारूड्यासोबत लग्न करण्याऐवजी विना लग्नाची राहील
युवती अनुषा म्हणाली, ज्या मुलाला दारू पिण्याची सवय आहे आणि आपल्या लग्नातदेखील जो दारू पिऊन भांडण करतो त्याच्यासोबत माझे भविष्य कसे असेल. दारूड्यासोबत लग्न करण्याऐवजी मी विना लग्नाची राहील. 


 

बातम्या आणखी आहेत...