आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधौलपूर(राजस्थान)- पत्नीच्या मृत्यूनंतर युवकाने दुसरे लग्न करण्याचा विचार केला आणि दलालांच्या मदतीने त्याने दुसरे लग्नही केले. पण नववधुने मधुचंद्राच्या रात्री पळ काढला. नंतर राममथुरा पोलिसांनी तिला सिद्धपुराच्या जंगलातून पकडून चौकशीसाठी ठाण्यात नेले. चौकशी दरम्यान तिने सांगितले की, दलालांनी मला वॉट्सअॅपवर एका 20 वर्षीय युवकाचा फोटो दाखवून 40 वर्षांच्या मानसासोबत लग्न लावले.
मुलगी म्हणाली- मी अल्पवयीन आहे आणि तो 40 वर्षांचा असून त्याला 9 वर्षांचा मुलगा आहे
वधु म्हणाली, सोनभद्र जिल्ह्यातील रावर्टगंजमध्ये दलाल मंजू आणि दिनेशने मुलीच्या आई-वडिलांना फुस लावून, लग्न चांगल्या घरात लग्न करून देतोत असे सांगून तिला राजस्थानला नेले. लग्न करण्यासाठी त्या दोघांनी आई-वडिलांना वॉट्सअॅपवर मुलाचा फोटोदेखील दाखवला. पोठो पाहून त्यांनी होकार दिला आणि मुलीला राजस्थानला पाठवले. त्यानंतर दलालांनी आधीच ठरल्याप्रमाणे 15 मार्चला मुलीचे लग्न लावून दिले. लग्न होईपर्यंत मुलाने चेहऱ्यावरील सेहरा काढला नव्हता, त्यानंतर लग्न होताच त्याने सेहरा काढला आणि समोर होता एक 40 वर्षीय माणुस. त्यानंतर तिला कळाले की, त्याचे आधीच एक लग्न झाले आहे आणि त्याला एक 9 वर्षांचा मुलगादेखील आहे.
सव्वा लाखात झाला मुलीचा सौदा
पोलिसांनी तपास लावला असता, सव्वा लाखात मुलीचा सौदा झाला असल्याचे समोर आले आहे. सध्या पोलिसांनी मुलीला बाल कल्याण समितीच्या मदतीने तिला आपल्या घरी भरतपूरला पाठवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.