आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 वर्षीय व्हर्जिन तरुणीची फेसबुकवर विक्री, 5 लोकांनी लावली बोली, बनली देशातली सर्वात महागडी नवरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुबा- साऊथ सुदानमध्ये लग्नासाठी एका 17 वर्षीय व्हर्जिन मुलीची फेसबुकवर विक्री करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. जवळपास 5 पुरूषांनी तिच्यावर बोली लावली. सगळ्यात जास्त रक्कमेची बोली लावणारा पुरुष एक धनाढ्य व्यापारी आहे. त्याने मुलीच्या बदल्यात तिच्या वडिलांना 500 गायी, तीन आलिशान कार आणि 7 लाख रुपये दिले.

 

दोघांचे लग्न 3 नोव्हेंबरला झाले. एवढेच नाही तर ही तरुणी आता देशातील सर्वात महागडी नवरी ठरली आहे. सध्या या जोडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

फेसबुकवर तरूणीला विकत घेण्यासाठी लागली कोट्यावधींची बोली

> ईस्टर्न लेकचे इन्फॉर्मेशन मिनिस्टर तबन अब्देल यांनी सांगितल्यानुसार, तरूणीला जूबा शहरात अज्ञात ठिकाणी लपवून ठेवण्यात आले आहे. मीडियावर तिच्याबद्दल काहीच माहीती आली नाही. 
> तबन यांनी सांगितले की, तरुणीचा लिलाव करण्‍यासाठी तिच्याबद्ल्यात मिळणारा हुंडा मागण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला. त्यामुळे हा सर्वप्रकार समोर आला आहे. 
> या घटनेनंतर सुदानमध्ये काम करणाऱ्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या लिलावाला कडाडून विरोध केला आहे. त्यांनी या प्रकरणावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
> साऊथ सुदानचे आंतरराष्ट्रीय डायरेक्टर जॉर्ज ऑटिम यांनी सांगितल्यानुसार, जगातल्या सर्वात मोठ्या सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून तरूणींची अशाप्रकारे विक्री केली जात आहे, यावर विश्वासच बसत नाही.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...