आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाला झाले होते 3 दिवस, नवरीचा झाला गूढ मृत्यू, सासरा म्हणाला- बाथरूमचे दार तोडल्यावर बादलीवर होते सुनेचे डोके...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चुरू (राजस्थान) - गुरुवारी एका 24 वर्षीय नवविवाहितेचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. मृत तरुणीचे लग्न 19 नोव्हेंबर रोजी राजकुमार सैनी याच्यासोबत झाले होते. कुटुंबीयांकडून तक्रार मिळाल्यावर गुन्हा नोंद करून पोलिसांनी मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. दुसरीकडे मृत मुलीच्या वडिलांनी तारेने गळा आवळून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे. 

 

पती-पत्नी दोघेही होते बँकेत...
पोलिस अधिकारी महेंद्रदत्त शर्मा म्हणाले- मृत नववधूचे वडील परमेश्वरलाल यांनी तक्रार दिली की, त्यांची मुलगी प्रज्ञाचे 19 नोव्हेंबर रोजी राजकुमारसोबत लग्न झाले होते. 20 नोव्हेंबरला 8.30 वाजता ती माहेरी आली आणि एका तासानंतर सासरी गेली. गुरुवारी सकाळी 11.30 वाजता सूचना मिळाली की, प्रज्ञाचा मृत्यू झाला आहे. ते हॉस्पिटलमध्ये आले, तेथे मुलीचा मृतदेह दिसला. तिच्या गळ्यावर एखाद्या तारेने गळा आवळल्याची खूण होती. माझ्या मुलीचा गळा आवळल्याने मृत्यू झाला आहे. तथापि, मृत प्रज्ञा बँकेत कार्यरत होती. ती झुंझुनूं जिल्ह्याच्या नवलगड येथील बीआरजीबी बँकेत पीओ पदावर कार्यरत होती. तर पती राजकुमार गुजरातेत एसबीआय बँकेत कार्यरत आहे.


सासरा म्हणाला- बाथरूममधील बादलीवर होता प्रज्ञाचा चेहरा

प्रज्ञाचे सासरे जयभगवान सैनी म्हणाले की, सकाळी 9 वाजेनंतर प्रज्ञा बाथरूममध्ये अंघोळीसाठी गेली होती. खूप उशिरापर्यंतही ती बाहेर निघाली नाही. तेव्हा बाथरूमचे दार ठोठावले. दार न उघडल्याने ते तोडण्यात आले. आतमध्ये प्रज्ञा बेशुद्ध पडलेली होती. तिचा चेहरा बादलीवर होता. प्रज्ञाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. 

 

बातम्या आणखी आहेत...