आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Bride to be, 25 Had Severe Headache, Thought It Was Just Migran, But EVERYTHING WAS WIPED OUT OF BRAIN

शॉकिंग: लग्नाला काही दिवसच उरले असता अचानक बेशुद्ध झाली तरुणी, शुद्धीवर येताच सांगितल्या हैराण करणाऱ्या गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंड - इंग्लंडच्या फालमाउथ शहरात राहणारी 25 वर्षीय फ्रॅन गिलचे लग्न होणार होते, परंतु तिच्यासोबत अशी एक घटना घडली, ज्यामुळे तिचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन गेले. फ्रॅन दीर्घ काळापासून डोकेदुखीमुळे त्रस्त होती. तिला वाटायचे की, तिला मायग्रेनचा आजार आहे. तिच्या लग्नाची तारीख जवळ येऊन ठेपली होती, पण अचानक तिच्या डोक्यात भयंकर वेदना झाल्या आणि ती बेशुद्ध झाली. हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या दिवशी तिचा डोळा उघडला तेव्हा ती सर्वकाही विसरली होती. 

 

मायग्रेन नाही, होता भयंकर आजार...
- डॉक्टरांनी सांगितले की, ज्याला ते मायग्रेनचा आजार समजण्याची चूक करत होते, वास्तविक तो इन्सेफेलायटिस नावाचा गंभीर आजार होता. इन्सेफेलायटिस मेंदूतील इन्फेक्शनला म्हणतात, ज्यात मेंदूवर सूज येते. या इंफेक्शनमुळे फ्रॅनच्या मेंदूतील सर्व स्मृती नाहीशा केल्या.

होणाऱ्या नवऱ्यालाही नाही ओळखले
- या घटनेमुळे फ्रॅनचे कुटुंब स्तब्ध आहे. फ्रॅनला जेव्हा जाग आली तेव्हा ती असा व्यवहार करत होती, जशी काही कुणालाच ओळखत नसेल. ती भ्यायलेली होती. शुद्धीवर येताच खुद्द फ्रॅन म्हणाली की, ''मला सांगण्यात येतेय की मी बेशुद्ध झाले होते. जेव्हा मी माझ्या वाग्दत्त वराला आणि कुटुंबीयांना भेटले, तेव्हा वाटले की, पहिल्यांदाच कुणाला तरी भेटत आहे. मी त्यांना ओळखत नव्हते. मग मला सांगण्यात आले की, ते कोण आहेत आणि माझे लग्नही होणार आहे.''

- फ्रॅन हेसुद्धा विसरली की, तिने तब्बल 50 लाख रुपये खर्च करून मरीन बायोलॉजीचे शिक्षण घेतले होते आणि ती एक मरीन बायोलॉजिस्ट आहे. फ्रॅन म्हणाली, ''असे वाटतेय जणू काही मी स्वत:शीच भेटत आहे. मी आरशात स्वत:ला ओळखू शकत नाहीये. हा माझ्यासाठी अतिशय कठीण काळ आहे.''

 

रोखावे लागले लग्न
- या आजाराची माहिती मिळाल्यानंतर फ्रॅनचे लग्न रोखण्यात आले. तिच्या भावी पतीलाही खूप दु:ख झाले, कारण ती त्यालासुद्धा ओळखत नव्हती. फ्रॅन हेसुद्धा विसरली की, 2014 मध्ये ती आपल्या प्रियकराला भेटली होती. तो तिच्याच कॉलेजमध्ये शिक्षक होता आणि दोघांनी 2015 मध्ये साखरपुडाही केला होता. फ्रॅन म्हणाली की, तिला थोडा वेळ पाहिजे, या घटनेमुळे तिला मोठा धक्का बसलेला आहे. कुणावर विश्वास ठेवावा, काहीच कळत नाहीये.

 

पुन्हा शिकत आहे सर्व गोष्टी
- फ्रॅन या आजारातून आता हळूहळू बाहेर येत आहे. तथापि, ती अगदी लहानसहान गोष्टीसुद्धा विसरली आहे. तिला पुन्हा लिहिणे, कंप्यूटर चालवणे सुरू केले, ज्यामुळे तिला जास्तीत जास्त गोष्टी आठवतील. तिला सर्वात जास्त दु:ख याचे आहे की, तिला आपला व्यवसाय आणि मास्टर डिग्रीतील शिकलेल्या सर्व गोष्टी विसरली आहे. फ्रॅन यासाठी पुन्हा अभ्यास करण्याच्या तयारीत आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेशी संबंधित आणखी Photos...   

 

बातम्या आणखी आहेत...