आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दागिने घेऊन विवाहितेचे प्रियकरासोबत पलायन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि रोख दीड लाख रुपये घेऊन विवाहितेने प्रियकरासोबत धूम ठोकल्याचा प्रकार औसा तालुक्यातील सोनपट्टी येथे घडला आहे. 

औसा पोलिस ठाण्यानुसार सोनपट्टी तांडा (ता. औसा) येथील अनिकेत  पवार याचा काही महिन्यांपूर्वी विवाह झाला. अनिकेत,  आई - वडील ,पत्नीसोबत सोनपट्टी परिसरात मोलमजुरी करून कुटुंबाची उपजीविका भागवतो.
सोमवारी सकाळी  सगळी मंडळी झोपलेली असताना अनिकेतची पत्नी संगीता (नाव बदलले आहे)  प्रातर्विधीसाठी जात असल्याचे सांगून  बाहेर गेली. बराच वेळा झाला तरी ती परत आली नाही. त्यामुळे पतीने शोधाशोध केली. परंतू तिचा शोध कुठे लागला नाही. यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.