आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bride Vomits And Groom Gets Her Virginity And Pregnancy Test Done Without Her Permission

वधूला झाली उलटी, नवरदेवाने हॉस्पिटलमध्ये केले दाखल; वधूला वाटले की पती तिची काळजी करतो, पण यामागचे कारण होते वेगळेच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नॅशनल डेस्क (बंगळुरू) - शहरात एक नवरदेवाने लग्नाच्या काही तासानंतर वधूची प्रकृती बिघडल्यावर संशयामुळे तिची कौमार्य आणि प्रेग्नेंसी चाचणी केली. विशेष म्हणजे यासाठी तिची परवानगी घेण्यासाठी तिच्याकडून धोक्याने कागदपत्रांवर स्वाक्षरी देखील करून घेतले होते. आता प्रकरणात महिलेने आपल्या पतीवर संशय घेणे आणि मानसिक छळाचा आरोप करत कोर्टात खटला दाखल केला आहे. पीडिता आणि आरोपी दोघेही उच्चशिक्षित आहेत. याबाबत काउंसलरने आरोपी पतीला विचारणा केली असता त्याने आपली चूक मान्य करण्यास नकार दिला. 

 

लग्नाच्या दिवशी मिळाला धोका...

> बंगळुरू येथील रक्षा (26) आणि शरद (29 ) (बदलेले नाव) दोघेही MBA पदवी धारक आहेत. एका मेट्रिमोनियल साइट दोघांची ओळख झाली होती. काही दिवस सोबत राहिल्यानंतर दोघांनी नोव्हेंबर 2018 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. 


> लग्नाच्या दिवशी अचानक वधूची प्रकृती खराब झाली आणि पोटातील गॅसमुळे तिला उलट्या होत होत्या यानंतर शरदने तिला रूग्णालयात दाखल केले. मुलीला वाटले की तो तिच्यावर उपचार व्हावा यासाठी हे करत आहे. पण तेथे पोहोचल्यानंतर जे घडले त्यामुळे तिला जबर धक्का बसला. 


डॉक्टर्स करत होतो वर्जिनिटी आणि प्रेग्नेंसी टेस्ट 

> हॉस्पिटलमध्ये डॉक्टर तिची वर्जिनिटी आणि प्रेग्नेंसी टेस्ट करत आहेत हे समजल्यानंतर रक्षा हैराण झाली. तिला उलट्या झाल्यामुळे तिच्या पतीने तिच्या चारित्र्यावर संशय आला होता. यामुळे त्याने रक्षाची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. याबद्दला त्याने पत्नीला काहीच सांगितले नव्हते. 

> या घटनेनंतर मुलीने पतीचे घर सोडले आणि आपल्या बहिणीकडे राहण्यास गेली. तीन महिन्यांनतंर वाद मिटविण्यासाठी शरदच्या कुटुंबाने काउंसलिंग सेंटरमध्ये संपर्क साधला आणि रक्षा विरोधात तक्रार दाखल केली. यानंतर काउंसलिंग सेंटरने युवतीला नोटिस जारी केली. पण युवतीची आपबीती ऐकल्यानंतर त्यांना देखील धक्का बसला. 

> महिलेने त्यांना सांगितले की, शरद कशाप्रकारे अंधारात ठेवून तिची वर्जिनिटी आणि प्रेग्नेंसी टेस्ट करण्यासाठी सहमती अर्जावर स्वाक्षरी घेतली होती. यानंतर महिलेच्या सांगण्यानुसार सेंटरने तिच्या पतीची काउंसलिंग करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने आपली चूक मान्य करण्यास नकार दिला. 

बातम्या आणखी आहेत...