आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गोहाना/ हिसार - येथील संजयने संतोष नावाच्या मुलीसोबत हुंडा न घेता फक्त शगुन एक रुपया घेऊन लग्न केले. वधूलाही हेलिकॉप्टरमधून सासरी घेऊन गेला. संजयचे वडील सतबीर यांच्यानुसार हुंडा न घेता लग्न करण्यामागचे कारण म्हणजे 'बेटी बचाओ'चा सन्मान करणे. यामुळे लोक मुलीला ओझे समजणार नाहीत. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावामध्ये पहिल्यांदाच असे घडले आहे की हुंडा न घेता लग्न झाले आणि मुलगीही हेलीकॉप्टरमध्ये बसून सासरी गेली.
सतबीर यांच्यानुसार, मुलीच्या वडिलांसमोर एकच अट ठेवली होती, ती म्हणजे हुंडा घेणार नाही आणि शगुनमध्ये फक्त एक रुपयाच घेणार. सर्वांच्या सहमतीने हे लग्न झाले. एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्याची हेलिकॉप्टरमध्ये बसून लग्न करण्यास जाण्याची आणि वधूलाही हेलिकॉप्टरमधून घरी आणण्याची इच्छा पूर्ण केली. वधू संतोष बीए पास असून वर संजय बीए फायनलला आहे. म्हणजेच मुलापेक्षा मुलगी जास्त शिकलेली आहे. हेलिकॉप्टर 10 फेब्रुवारीला सकाळी 11:30 वाजता हसनगढ गावात उतरले.
मुलीचे वडील म्हणाले- हेलिकॉप्टरमध्ये बसून जाईल असे वाटले नव्हते
हसनगढ निवासी यादव हे कामगार आहेत. त्यांना तीन अपत्य आहेत. संतोष मोठी मुलगी आहे. मुलीच्या लग्नाची त्यांना सारखी चिंता वाटायची. यादव म्हणाले की, देवाची कृपा आणि मुलीच्या भाग्यामुळेच आज ती हेलिकॉप्टरमध्ये बसून सासरी गेली. कधीही माझ्या मुलीची अशी पाठवणी होईल असे वाटले नव्हते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.