Home | Khabrein Jara Hat Ke | Brides photo shoot went viral on internet, Latest bridal photoshoot viral with bros

मैत्रिणी नसल्यामुळे नवरी मुलीने फोटोशूटसाठी आपल्या 5 भावांना बोलविले, त्यानंतर भावांनी जे केले त्यामुळे होत आहे त्यांचे कौतुक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 13, 2019, 02:46 PM IST

यूनिक आयडियाची सोशल मीडियावर होत आहे प्रशंसा

  • व्हिडिओ डेस्क : सामान्यतः ब्रायडल फोटोशूटमध्ये नवरी आणि तिच्या मैत्रिणी असतात, पण प्रत्येक मुलगी आपल्या मैत्रिणींना बोलावेल हे आवश्यक नाही. ब्राझील येथील रिबेका ही सुद्धा अशाच मुलींपैकी एक आहे. रिबेका आपल्या अनोख्या कल्पनेमुळे सोशब मीडीयावर प्रसिद्धी मिळवत आहे. रिबेकाच्या ब्रायडल शूटमध्ये तिच्यासोबत मैत्रिणी नाही तर तिचे 5 भाऊ होते. त्यांनीच नवरी म्हणून सजत असलेल्या बहिणीसोबत पेडीक्योर, क्लीनअप आणि फेशियल करण्यासोबत तिला वेडिंग ड्रेस निवडण्यातही तिचे भाऊ मदत करत होते. हे प्रकरण 2017 चे आहे. पम रिबेकाची कल्पना आणि तिच्या भावासोबतचे फोटोच आजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

    रिबेका एक कॉम्प्युटर इंजीनिअर आहे. तिला एकही एकही मैत्रिण नाहीये. अशातच तिला लग्नाच्या एक आठवड्यापूर्वी कल्पना सुचली. भावांनी देखील बहिणी इच्छ पूर्ण करण्यासाठी रिबेकाला आनंद मिळण्यासाठी प्रत्येक गोष्टीत तिची मदत केली. या कल्पनेचे खूप कौतुक करण्यात आले होते. वरील व्हिडिओमध्ये ब्रायडल फोटोशूट पाहून तुम्हालाही ही कल्पना पसंद पडेल.

Trending