आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुणे : येथे कंजारभाट समाजात लग्नानंतर कौटुंबीक बैठक घेऊन मुलीची कौमार्याची (व्हर्जिनिटी टेस्ट) चाचणी घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. लाजीरवाणी गोष्ट म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघेरी उच्च शिक्षित आहेत. तसेच त्यांचा परिवार देखील सुशिक्षीत आहे. मुलगा इंग्लंडमध्ये शिक्षण पूर्ण करून भारतात परतला आहे. मुलाच्या मागणीनुसार 31 डिसेंबर रोजी ही बैठक घेण्यात येऊन मुलीच्या कौमार्यची चाचणी घेण्यात आली होती. या बैठकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डिप्टी चॅरिटी कमिश्नर कृष्णा इंद्रेकर यांनी या लाजीरवाणी घटनेचा खुलासा केला आहे.
- पुणे येथील कोरेगाव पार्क येथे या जोडप्याचा विवाह पार पडला होता. यानंतर वराने वधूच्या कौमार्याची चाचणी घेतली. बैठकीतील मंडळी बाहेर बसलेली असाताना मुला-मुलीला एकातांत खोलीत बंद करण्यात येऊन ही चाचणी घेण्यात आली.
- कंजारभाट सामाजात प्रथा आहे की, नवरदेवाची इच्छा असेल तर नवरी मुलीला कौटुंबीक लोकांच्या आदेशावर व्हर्जिनिटी टेस्ट द्यावी लागते. यामध्ये मुलगी खरी उतरवा नाही तर लग्न मोडण्यात येते.
- या समाजात बऱ्याच काळापासून ही कुप्रथा चालत आली आहे. या प्रथेचा सर्व स्तरातून प्रचंड विरोध होत आहे. या प्रकरणामुळे या कुप्रथेबद्दलचा विरोध आणखीनच उफळून आला आहे.
- आश्चर्याची बाब म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघांची कौटुंबीक पार्श्वभूमी सुशिक्षीत आहे. मुलाचे वडील पुण्याचे माजी नगरसेवक आहेत. तर मुलीचे वडील निवृत्त पोलिस निरीक्षक आहे,
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.