आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्या दीर्घायुसाठी करवा चौथची तयारी करत होती पत्नी, तेवढ्यात तिरंग्यात लपेटून आला त्याचाच मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऊणा- हिमाचल प्रदेशचा  आणखी एक जवान देशासाठी शहीद झाला. जम्मू-कश्मिरच्या सोपोरमध्ये शुक्रवारी अचानक चकमक उडाली. यात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 32 वर्षीय लान्स नायक बृजेश शर्मा यांना वीरमरण आले. ते ऊना जिल्ह्यातील नाववी गावात राहत होते. शनिवारी करवा चौथच्या दिवशी तिरंग्यामध्ये गुंडाळलेले त्यांचे पार्थिव जेव्हा घरी आणले, तेव्हा त्यांची पत्नी बेशुद्धच पडली. काही तासांपूर्वी करवा चौथची तयारी करणाऱ्या शहीदाच्या पत्नीला त्याच्याच अंत्यविधीची तयारी करावी लागली. 

 
दोन महिन्यांची गर्भवती होती पत्नी
शहिद बृजेश यांची पत्नी श्वेता दोन महिन्यांची गर्भवती आहे. पत्नी श्वेता यांचे रडून हाल झाले आहे. त्यांच्या कुटुंबावर देखील दुःखाचे डोंगर कोसळले. त्यांच्या पश्चात आई ध्रुव देवी, पत्नी श्वेता, सहा वर्षांची मुलगी आणि एक भाऊ असा परिवार आहे.

 

15 वर्षांपूर्वीच सैन्यात भरती झाले होते बृजेश 

> हॅलिकॉप्टरने शहिद बृजेश यांचे पार्थिव शनिवारी त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. याच ठिकाणी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

> 2003 मध्ये बृजेश 14 पंजाब रेजीमेंटमध्ये 2भरती झाले होते. ते जम्मू-कश्मिरच्या शोपिया येथे तैनात होते.

> बारामुला जिल्ह्यातील सोपोरमधील पजलपोरा या ठिकाणी शुक्रवारी झालेल्या चकमकित बृजेश गंभीर जखमी झाले होते. त्यांना वेळीच रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बातम्या आणखी आहेत...