Home | International | Other Country | Britain: 10 thousand martyrs to commemorate the martyrdom of the First World War

ब्रिटन:पहिल्या महायुुद्धातील शहिदांच्या स्मरणार्थ 10 हजार मशाली

दिव्य मराठी | Update - Nov 07, 2018, 09:48 AM IST

११ नोव्हेंबर रोजी पहिल्या महायुद्ध समाप्तीची शतकपूर्ती होईल.

  • Britain: 10 thousand martyrs to commemorate the martyrdom of the First World War

    लंडन - ब्रिटनमध्ये जागतिक महायुद्धादरम्यान प्राण गमावणाऱ्यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ११ नोव्हेंबर रोजी पहिल्या महायुद्ध समाप्तीची शतकपूर्ती होईल. तेव्हा या युद्धात टॉवर ऑफ लंडनला वाचवण्यासाठी राजाच्या शेकडो सैैनिकांनी बलिदान दिले होते. त्याच टॉवर ऑफ लंडनच्या परिसरातील हिरवळीवर सैन्य दलाचे अनेक जवान, स्वयंसेवकांनी सोमवारी १० हजारांहून अधिक मशाली पेटवून बलिदानाचे स्मरण केले.

    या मशालींच्या प्रकाशानेे गवताळ मैदानही लखलखत होते. शाही नौदलाशी संबंधित बलराज ढंडा म्हणाले, स्वयंसेवकांनी मशाली पेटवण्यासाठी योगदान दिले. आपला देश किंवा साम्राज्य वाचवण्याच्या कार्यात ज्यांच्या पिढ्यांनी योगदान दिले. त्यांचे या माध्यमातून स्मरण करण्यात आले. या मशाली चार तासांपर्यंत प्रज्वलित राहिल्या. दुसऱ्या महायुद्धात भारतासह अनेक देशांच्या सैनिकांचे योगदान राहिले आहे.

Trending