आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रिटन : 900 रुपयांच्या अंगठीला मिळाले 6.8 कोटी रुपये 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- ब्रिटनमधील एका महिलेने ३३ वर्षांपूर्वी १० पाऊंडमध्ये (९२५ रुपये) एक नकली हिऱ्याची अंगठी विकत घेतली होती. परंतु प्रत्यक्षात ही अंगठी खरोखरच्या हिऱ्याची असून याची किंमत ६ कोटींवर असल्याचा उलगडा झाला. ५५ वर्षांच्या डेब्रा गोडार्ड यांना हिऱ्याच्या अंगठीचा मोह असल्याने त्यांनी नकली हिऱ्याची अंगठी घेतली. पण डेब्रा ज्वेलर्सने त्यांना ही अंगठी खरी असल्याचे सांगितले.

 

२६.२७ कॅरेटच्या हिऱ्याची ही अंगठी होती. त्यांचा विश्वास बसत नव्हता त्यामुळे त्या हिरे व्यापाऱ्याकडे गेल्या व त्याने या अंगठीचा लिलाव करण्याचा सल्ला दिला तेव्हा कळले की, अंगठीतील हिरा अतिशय प्राचीन आहे. अखेर अंगठीचा लिलाव होऊन यावर ६.८२ कोटींची बोली लागली. कर कपात होऊन डेब्रा यांना ४.५ कोटी रुपये मिळाले. 

 

बातम्या आणखी आहेत...