आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन - ऑफिसच्या कॅन्टीनमधून सँडविच चोरी करणे 31 वर्षीय बँकरला चांगलेच महागात पडले. पारस शाह असे बँकरचे नाव आहे. शाहचे तब्बल 9 कोटी रुपये (1 मिलियन पाउंड) इतके वार्षिक पॅकेज आहे. इन्व्हेस्टमेंट बँक सिटी ग्रुपने चौकशीनंतर पारसला निलंबित केले. तो युरोप, मध्य पूर्व आणि आफ्रिकेत सिटीग्रुप हेड होता.
फायनान्शियल टाईम्सच्या रिपोर्टनुसार, बँकेने पारसला अनेक आरोपांनंतर निलंबित केले. यामध्ये लंडन मुख्यालयातील कॅन्टीनमधून सँडविच चोरण्याचा आरोप आहे. दरम्यान पारसने कॅन्टीनमधून किती वेळा आणि किती सँडविच चोरले याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. ब्रिटीश माध्यमांच्या वृत्तानुसार सिटीबँक किंवा पारस शाह या दोघांनीही या संदर्भात आपली भूमिका मांडलेली नाही.
सिटीग्रुपपू्र्वी एचएसबीसीमध्ये करायचा नोकरी
लिंक्डइन प्रोफाइलनुसार, शाहने युनिव्हर्सिटी ऑफ बाथ येथून 2010 साली अर्थशास्त्राची पदवी घेतली होती. सिक्युरिटीज, ट्रेडिंग आणि रिस्क मॅनेजमेंटमध्ये त्याची प्रकर्षाने उपस्थिती आहे. सिटीबँकमध्ये नोकरी करण्यापूर्वी त्याने सात वर्षे एचएसबीसीमध्ये काम केले आहे. बँकेच्या कर्मचार्यांचे वार्षिक बोनस भरायचे असताना त्याला निलंबित करण्यात आले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.