आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटन महात्मा गांधींच्या सन्मानार्थ नाणे काढणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन : महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहताना ब्रिटन सरकारने त्यांच्या स्मृतीत नाणे जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनचे अर्थमंत्री साजिद जाविद यांनी बापूंच्या सन्मानार्थ हे नाणे जारी केल्याची माहिती दिली. ब्रिटनने १९३१ मध्ये गाेलमेज संमेलनासाठी महात्मा गांधी यांनी ब्रिटनचा दाैरा केला हाेता. त्या स्मृतीत हा निर्णय घेण्यात आला.

पाकिस्तानी वंशाचे ब्रिटिश मंत्री जाविद म्हणाले, आम्ही ब्रिटनच्या राॅयल मिंटकडे महात्मा गांधी यांच्या स्मृतीत एक नाणे जारी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. जगाला त्यांनी दिलेली शिकवण चिरंतन स्वरूपात राहावी या उद्देशाने नाणे जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. लंडनमध्ये गुरुवारी ब्रिटिश एशियन सक्सेसवर आयाेजित कार्यक्रमात ब्रिटनच्या मंत्र्यांनी ही घाेषणा केली.

जाविद म्हणाले, शक्ती कधीही पैसा किंवा माेठ्या पदावरून राहून मिळत नसते. त्यांनी शिकवलेल्या जीवनमूल्यांचे आपण विस्मरण करता कामा नये. त्याशिवाय आई-वडिलांनी शिकवलेल्या गाेष्टीही लक्षात ठेवल्या पाहिजे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे हे वर्ष आहे. दरवर्षी २ आॅक्टाेबरला त्यांच्या जन्मदिन संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा करते. १९३१ मध्ये लंडनमध्ये गाेलमेज परिषदेत ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एकमेव प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले हाेते. बापूंच्या सन्मानार्थ ब्रिटनमध्ये चार प्रमुख ठिकाणी त्यांचे पुतळेही उभारण्यात आले आहेत. इतर अनेक देशांतही महात्मा गांधी यांचे पुतळे आहेत.

प्रीती, ऋषी शक्तिशाली आशियाई
जीजी २ शक्तिशाली लाेकांच्या यादीत ब्रिटिश सरकारमध्ये भारतीय वंशाच्या गृहमंत्री प्रीती पटेल दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ऋषी सुनाकही यादीत ७ व्या क्रमांकावर आहेत. ते इन्फाेसिसचे सहसंस्थापक नारायणमूर्तींचे जावई आहेत. जाविद यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत.