आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 91 रुपयांत होत आहे लाखों रुपयांच्या घराचा लिलाव, सर्वांच्यासाठी खुली आहे ऑफर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रेडफोर्ड - ब्रिटनमध्ये 3 बेडरूम असलेली एक प्रॉपर्टी अगदी स्वस्तात विकली जात आहे. फक्त 1 पौंड म्हणजे 91 रुपयांपासून बोली सुरू होणार आहे. एवढी कमी बोली सुरू करण्याचे कारण म्हणजे 2015 मध्ये या घराला लागलेली भयानक आग. या घटनेनंतर या घराची अवस्था अत्यंत वाईट झाली आणि तेव्हापासून ते रिकामेच आहे. तर ज्या रस्त्यावर हे घर आहे, त्याठिकाणी अगदी साध्या घराची किंमत ही कमीत कमी 67 हजार पाऊड (60 लाख) आहे. घरासाठी लीड्समध्ये 12 डिसेंबरला लिलाव होईल. 


घरावर टॅक्स थकलेला नाही 
- ब्रिटनच्या ब्रेडफोर्डमधील होमवूडमध्ये एक 3 बेडरूमच्या घराचा लिलाव अवघ्या 1 पौंडपासून सुरू होणार आहे. 2015 मध्ये लागलेल्या आगीनंतरपासून हे घर अगदी रिकामे पडलेले आहे. त्यानंतर या घरासाठी एवढी कमी बोली लावण्यात आली आहे. 
- विशेष म्हणजे या घरावर कोणत्याही प्रकारचा टॅक्सही थकलेला नाही. त्यामुळे खरेदी करणाऱ्यावर अधिकचा आर्थिक बोजाही पडणार नाही. या घरासाठी कोणीही बोली लावू शकणार आहे. 
- सध्या ही प्रॉपर्टी खरेदी-विक्री करणाऱ्या एका खासगी फर्मच्या ताब्यात आहे. पण सर्वात जास्त बोली लावणाऱ्याला या घराची मालकी मिळणार आहे. 
- एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही हे घर दुरुस्त करण्याच्या विचारात होतो. पण कोणत्याही बिल्डरने त्यात रस दाखवला नाही त्यामुळे आम्ही विक्री करण्याचा निर्णय घेतला. 
- एखाद्या नव्या प्रोजेक्टची सुरुवात करणाऱ्या व्यक्तीसाठी ही एक मोठ्या गुंतवणुकीची संधी आहे. घर खरेदी करणाऱ्यांसाठीही दुर्मिळ संधी आहे. त्यांना याद्वारे एक स्वस्त घर मिळू शकते. 
- लिलावाच्या माध्यातून प्रॉपर्टी विकत घेणाऱ्यास त्याबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार असतील. 

बातम्या आणखी आहेत...