आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या ९५ व्या वर्षीही कपडे शिवतात ब्रिटनमधील सर्वात वयस्कर एल्विन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ९५ वर्षीय एल्विन ह्यू ब्रिटनमधील सर्वात वयस्कर शिंपी आहेत. या वयातही ते कपडे शिवतात. त्यांचा संपूर्ण दिवस मित्रपरिवार आणि नातेवाइक व सहकाऱ्यांचे कपडे शिवण्यात जातो. यॉर्कशायर येथे राहणारे एल्विन पाच वर्षापूर्वी  येथील केअर होममध्ये राहण्यास आले, तेव्हा आपल्याला वेळ मिळेल तसा आपल्या खोलीत मशीन व कपडे शिवण्याचे साहित्य आणून ठेवले होते. ३० च्या दशकात त्यांनी  वयाच्या १४ व्या वर्षांपासून प्रथमच शिवणकाम सुरू केले. एल्विन यांना १९४२ मध्ये दुसऱ्या महायुद्धात पाठवण्यात आले. तेव्हा त्यांना मशीन गनरचे प्रशिक्षण देण्यात आले होते. लष्करातील अधिकाऱ्यांना त्यांच्या शिवणकामाची माहिती झाली तेव्हा त्यांनी सैनिकांच्या गणवेशांवर पट्ट्या लावण्याचे काम देण्यात आले. युद्धाहून परतल्यानंतर एल्विन यांनी लग्न केले आणि संपूर्ण आयुष्य स्कर्टस व पुरूषांचे सूट्स शिवले. त्यांची शिलाई लोकांना खूप आवडत होती. 

 

१४व्या वर्षी शिवणकामास सुरूवात ८०व्या वर्षी निवृत्त

वयाच्या ८० व्या वर्षी कामातून निवृत्ती घेतली. परंतु काम करण्याची आवड कमी झाली नव्हती. यामुळे त्यांनी घरीच मशीन चालवून काम करणे सुरू ठेवले. ते आजही केअर  होममध्ये सुरू आहे. ते सांगतात, मी लहान असताना इतराप्रमाणे मी खाणीत काम करू लागेल असे आईवडिलांना वाटत होते. पण मला तर शिंपी व्हायचे होते. मी कधी बिअर बारमध्ये गेलो आणि आपण शिवलेला सूट घातलेली व्यक्ती दिसली तर मला खूप आनंद होत असे. कपडे शिवण्यामुळे मी कार्यरत राहतो. माझ्या वयातील लोक सगळा दिवस टीव्ही पाहण्यात घालवतात. पण मी तसे करत नाही. प्रत्येक व्यक्तीने सक्रीय असावे, असे मला वाटते. अन्यथा धावपळीच्या जगात तुम्ही खूप मागे राहाल, असे ते सांगतात. 

बातम्या आणखी आहेत...