आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ब्रिटनचे प्रिन्स हॅरी सध्या सातत्याने चर्चेत आहेत. पहिल्यांदा राजेशाही कुटुंबातून स्वतंत्र हाेण्याची घाेषणा केल्याने... आता ‘माेस्ट अटेंटिव्ह हस्बंड’ पुरस्कारामुळे. त्यांनी २ जानेवारीला ट्विटरवर त्यांच्याशी संबंधित एक व्हिडिओ पाेस्ट केला, ज्यामध्ये ते वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या पत्नीचे केस नीट करताना दिसतात. आपल्या पत्नीवरील प्रेम दर्शवणारा हा व्हिडिओ आतापर्यंत २ काेटी ६० लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.
ते सात क्षण, जेव्हा त्यांनी पत्नीला राजेशाहीच्या आधी प्राधान्य दिले
1.जेव्हा मेगनशी लग्न केले
हॅरी आणि अमेरिकेची अभिनेत्री मेगन जुलै २०१६ मध्ये पहिल्यांदा ब्लाइंड डेटच्या माध्यमातून भेटले. २०१७ मध्ये हॅरी यांनी मेगनसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी स्वत: डिझाइन केलेली अंगठी मेगनला दिली. १९ मे २०१८ राेजी दाेघांनी लग्न केले.
2. जेव्हा माध्यमांवर गरजले
हॅरी हे मेगनच्या सुरक्षिततेबद्दल खूप सतर्क असतात. ब्रिटनमधील वृत्तपत्रांत दाेघांच्या प्रेमाच्या बातम्या प्रसिद्ध हाेऊ लागल्या आणि वर्तमानपत्रात जेव्हा मेगनवर त्यांच्या रंगावरून हल्ला झाला त्या वेळी हॅरी यांनी या वर्तमानपत्रांवर टीका करण्यासाठी अधिकृत विधान प्रसिद्ध केले.
3. जेव्हा भावाबराेबरच्या भांडणाचे वृत्त आले
हॅरी आणि मेगन मार्च २०१९ मध्ये केन्सिंग्टन पॅलेस या शाही निवासातून विभक्त झाले. त्याचदरम्यान हॅरी यांचा भाऊ विल्यम्सबराेबर भांडण सुरू असल्याची चर्चा रंगली हाेती. हॅरी यांच्यासाठी २४ लाख पाउंड खर्च करून नवीन शासकीय निवासस्थान उभारण्यात आले हाेते.
4. राजेशाहीपासून वेगळे हाेण्याचे संकेत दिले
मे २०१९ मध्ये मेगन यांनी बाळाला जन्म दिला. आर्ची असे नाव ठेवले. परंतु त्याच वेळी या शाही दांपत्याने वर्तमानपत्रात आपण राजेशाहीपासून वेगळे हाेत असल्याचे पहिल्यांदा संकेत दिले. हॅरी म्हणाले, आपल्या मुलाच्या नावाबराेबर काेणतीही राजेशाही उपाधी लावू नये. उलट सामान्यांप्रमाणे त्याच्या नावापुढे ‘मास्टर’ असेच म्हणावे.
5. लघुपटातून जाहीर केला स्वत:चा तणाव
हॅरी आणि मेगन सप्टेंबर २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेला गेले. तेथे एका लघुपटातून दाेघांनी आपल्यावरील तणाव जाहीर केला. ब्रिटनच्या वर्तमानपत्रांना घाबरून आपल्या मित्रांनी हॅरीबराेबर लग्न करण्याचा कसा सल्ला दिला याचा खुलासा मेगनने केला. त्याचप्रमाणे हॅरींनी सांगितले की, ते जेव्हा कॅमेरा बघतात त्या वेळी आपली गमावल्याची वेदना पुन्हा उरात भरून येते.
6. जेव्हा वर्तमानपत्रावर खटला भरला
मेगनने आॅक्टाेबर २०१९ मध्ये आपल्या वडिलांना एक पत्र लिहिले. हे पत्र एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध करून टाकले. हॅरीनेही वर्तमानपत्राला फटकारताना सांगितले की, आता मूक म्हणून राहणार नाही. मी अशाच प्रकारे माझी आई गमावली आणि आता पत्नीचा बळी जाताना बघू शकत नाही.
7. कुटुंबापासून वेगळे हाेण्याचे अंतिम संकेत
नाेव्हेंबर २०१९ मध्ये मेगन आणि हॅरी म्हणाले, या वर्षीचा नाताळ कुटुंबाबराेबर साजरा करणार नाही. नंतर ठीक ८ जानेवारी २०२० राेजी दाेघांनी राजेशाहीपासून बाजूला हाेण्याचे जाहीर केले. आर्थिकदृष्ट्याही स्वावलंबी व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.