आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • British Airways Threatens Crying Indian Baby Off The Plane, Couple Offloaded By Staff

British Airways मध्ये रडणा-या बाळाला दिली फेकून देण्याची धमकी, 2 भारतीय कुटुंबांना हकलले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ब्रिटिश एअरवेजच्या विमानात स्टाफने भारतीय अधिकाऱ्याच्या कुटुंबियांशी वर्णद्वेषी भेदभाव करत त्यांच्या बाळाला फेकून देण्याची धमकी दिली. कारण फक्त एवढेच की त्यांचे 3 वर्षांचे बाळ रडत होते. एवढेच नव्हे, तर त्यांनी विमान टर्मिनलवर घेऊन दोन भारतीय कुटुंबांना विमानातून बाहेर केले. त्या दुसऱ्या कुटुंबाची चूक फक्त एवढीच की ते रडणाऱ्या मुलाला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. 


नागरी उड्डयन मंत्र्यांकडे तक्रार...
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 1984 बॅचचे सनदी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत ही गैरवर्तणुक करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्याचे नाव अद्याप जाहीर करण्यात आले नाही. तरीही ते अधिकारी संयुक्त सचिव स्तराचे होते असे सांगितले जात आहे. ही घटना 23 जुलै रोजी घडली ज्यावेळी ते लंडन-बर्लिन फ्लाइट (बीए 8495) मध्ये प्रवास करत होते. त्यांनी गुरुवारी यासंदर्भातील तक्रार नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे. 


सीट बेल्टने घाबरला होता चिमुकला
पीडित अधिकाऱ्यांनी सुरेश प्रभू यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार, "मी आपल्या 3 वर्षांच्या मुलासोबत वेगळी सीट बुक करून प्रवास करत होतो. सुरक्षा घोषणा झाल्यानंतर माझी पत्नी सीट बेल्ट लावत होती. हे पाहून मुलगा घाबरला आणि त्याने रडण्यास सुरुवात केली. त्याला आम्ही शांत करण्याचा प्रयत्न करत होतो. त्याचवेळी एक क्रू मेंबर आमच्याकडे आला आणि आमच्यावर ओरडण्यास सुरुवात केली. त्यानेच रनवेवर असलेल्या स्टाफला विमान परत घेऊन जाण्याचा संदेश पाठवला. त्याचवेळी गलिच्छ भाषा वापरून तो मुलाला शांत होण्यासाठी ओरडत होता. एवढेच नव्हे, तर शांत झाला नाहीस तर विमानातून फेकून देईन अशी धमकी त्याने दिली. यानंतर आमच्या शेजारी बसलेलया एका भारतीय परिवाराने मुलाला बिस्किट देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या क्रू मेंबरने त्यांनाही शिवीगाळ करत आमच्यासह विमानातून उतरवले."


काय म्हणाले ब्रिटिश एअरवेज...
ब्रिटिश एअरवेजच्या प्रवक्त्यांनी सांगितले, "अशा प्रकारच्या वर्तनाची आम्ही गंभीर दखल घेतो. कुठल्याही परिस्थितीत अशी वर्तणुक सहन केली जाऊ शकत नाही. प्रवाश्यांसोबत भेदभाव मुळीच खपवून घेतला जाणार नाही. आम्ही पीडित व्यक्तीच्या संपर्कात आहोत. तसेच या घटनेची चौकशी सुद्धा सुरू करण्यात आली आहे."

बातम्या आणखी आहेत...