आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटन : दिवसभर फोनवर असलेल्या तरुणांसाठी लष्करांचे भरतीचे पोस्टर; पोेस्टरवर लिहिले, आम्हाला तुमची गरज आहे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन-  ब्रिटिश आर्मीने भरतीसाठी जाहिरात दिली आहे. सेल्फीचे शौकीन, व्हिडिओ गेम खेळणारे, साध्या गोष्टीवरून चिडणाऱ्या तरुणांसाठी या जागा असल्याचे म्हटले आहे. यासाठी लष्कराने पहिल्या महायुद्धातील पोस्टरवरून प्रेरणा घेऊन २०१९ चे पोस्टरसुद्धा काढण्यात आले आहेत. यावर मोठमोठ्या अक्षरांत तरुणांना रोजच्या सवयीचा उल्लेख आहे. लष्कराला कोणत्या खुबी हव्या आहेत, याचीही माहिती दिली आहे. उदा. सेल्फी काढणाऱ्यांसाठी वर स्पष्ट लिहिले आहे, सेल्फी अॅडिक्ट्स, त्यानंतर तुमच्या आत्मविश्वासाची गरज, तसेच फोनवर असणाऱ्या तरुणांसाठी फोन जॉम्बी असे लिहून लष्करास अशा फोकस्ड उमेदवारांची गरज असल्याचे म्हटले आहे. 

 

महायुद्धाच्या वेळी चालवली होती अशीच मोहीम 
महायुद्धात अमेरिका व ब्रिटनसह अनेक देशांनी युवर कंट्री नीड्स यू' (तुमच्या देशाला तुमची गरज आहे) अशी मोहीम राबवली होती. याद्वारे मोठ्या स्तरावर रागीट व झपाटलेल्या लोकांना लष्करात भरती करण्यात येत होते. अनेक ठिकाणी पोस्टर लावून लष्कराने लाेकांना महायुद्धात सहभागी होण्याचे आवाहनही केले होते. तेव्हा ही मोहीम यशस्वी ठरली होती. 

बातम्या आणखी आहेत...