आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटिश कंपनी मॅक्लॉरेनची १२ कोटी रुपयांची सुपर कार  एल्वा रोडस्टर सादर, गाडीत हवाच विंड शील्डचे काम करेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटिश कार निर्माती कंपनी मॅक्लॉरेनने सुपरकार एल्वा रोडस्टर सादर केली आहे. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे, तिला टप नाही, ना-ही विंड शिंल्ड. गाडीची किंमत १७ लाख डॉलर(सुमारे १२ कोटी रुपये) आहे. एवढी किंमत चुकवल्यानंतरही साउंड सिस्टिम वेगळी खरेदी करावी लागेल.


बाजारपेठेत प्रथम अनेक कन्व्हर्टिबल कार आलेल्या आहेत. म्हणजे, गरज आणि इच्छेनुसार,तिचे टप हटवले किंवा लावले जाऊ शकते. मात्र, मॅक्लॉरेनच्या या कारमध्ये टपाचा पर्यायच नाही. लोक प्रश्न उपस्थित करतात की, समजा चालकासमोर विंड शिल्ड नसेल तर हवेचे झपकारे सोसावे लागतील. यामुळे वाहन चालवताना परिणाम होईल. कंपनीने अॅक्टिव्ह एअरमॅनेजमेट सिस्टिमद्वारे ही अडचण सोडवली आहे. कार ताशी ४० किमी वेग पार करेल, त्यासोबत सिस्टिम कार्यरत होईल. यामुळे चालकासमोर हवाच एक न दिसणारी भिंत म्हणून तयार होईल, जी बाहेरून येणाऱ्या सोसाट्याचा वाऱ्यास त्याच्यापर्यंत पोहोचू देणार नाही. एक छोटा कार्बन फायबर विंड रिफ्लेक्टरही गाडीच्या समाेर आपोआप वर उचललेल आणि वेगवान हवेस गाडीतील प्रवाशांपर्यंत पोहाेचू देणार नाही.एखाद्या ग्राहकास वेगळी विंड शील्ड लावायची असेल तर कंपनी हा पर्याय उपलब्ध करत आहे. यासाठी वेगळी रक्कम द्यावी लागणार आहे. या कारमध्ये ८०४ अश्वशक्तीचे टर्बाेचार्ज्ड व्ही ८ इंजिन लावले आहे. इंजिन आसनाच्या खाली माउंट केले आहे. कार तीन सेकंदात ताशी शून्य ते १०० किमी वेग पकडू शकते. ३९९ कारची निर्मिती, २०२० मध्ये शेवटची डिलिव्हरी


कंपनीनुसार, एल्वा रोडस्टर मॉडेलचे केवळ ३९९ कारची निर्मिती केली जाईल. २०२० च्या अखेरीस अशा पहिल्या कारचा पुरवठा केला जाईल. या कारला कंपनीच्या १९६० च्या दशकात आलेल्या एल्वा रेसकारच्या मॉडेलवर तयार केले आहे. १९६६ मध्ये रोड अँड ट्रॅक मॅग्झीनने तिला तेव्हा सर्वात वेगवान कारचा दर्जा दिला होता.

बातम्या आणखी आहेत...