आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमीयुगुलाने हॅरी पॉटरच्या वेशभूषेत केले लग्न, भेटवस्तूमध्ये मिळाले घुबड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


लंडन (ब्रिटन) - येथे एका प्रेमीयुगुलाने वेगळ्याच शैलीत आपला विवाहसोहळा पार पाडला. हे जोडपे आपल्या लग्नात हॅरी पॉटर सिरीजमधील आपल्या आवडत्या व्यक्तिरेखेचे पोशाख परिधान करून एकमेकांचे जीवन साथी बनले. 31 वर्षीय मॅथ्यू टिपरने हॅरी पॉटर तर 34 वर्षीय रिया क्रिंगिसने हर्माइनीची यूल बॉलवाली ड्रेस परिधान केला होता. रिया आणि मॅथ्यू दोघेही हॅरी पॉटर सीरीजचे प्रचंड चाहते आहेत. 

 

हनीमूनला जाण्यापूर्वी करणार स्टुडिओचा दौरा

लग्नात हीच थीम ठेवण्यात आली होती. या लग्नात एका जोडप्याने हॅरी पॉटरच्या वेशात दाखल झाले होते आणि त्यांनी हॅरी पॉटर बनलेल्या मॅथ्यूला एक घुबड भेट म्हणून दिले. या व्यक्तिरेखांच्या पोशाखात लग्न करण्याचे आमचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद नव दाम्पत्याने व्यक्त केला. आता ते हनीमूनला जाण्यापूर्वी वाटफोर्ड येथील हॅरी पॉटर स्टुडिओचा दौरा करणार आहेत.