आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालंडन- ब्रेक्झिट करार बिलावर ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये शुक्रवारी तिसऱ्यांदा मतदान झाले, पण ते मंजूर झाले नाही. त्यात युरोपियन संघटनेसह (ईयू) ब्रिटनच्या भविष्याचा निर्णय होईल. थेरेसा मे पंतप्रधान राहतील की नाही हेही निश्चित होईल. ब्रेक्झिट मंजूर झाल्यानंतर राजीनामा देऊ असे थेरेसांना आधीच म्हटले आहे. कराराला मंजुरी मिळाल्यास ब्रिटन २२ मे रोजी ईयूतून बाहेर पडेल आणि न झाल्यास कराराशिवाय १२ एप्रिलला ईयूतून बाहेर पडावे लागेल. २९ मार्च २०१७ रोजी ब्रिटनच्या सरकारने कलम ५० लागू केले होते. त्यानुसार २ वर्षांनी ब्रेक्झिट लागू होणार आहे.
अर्थात, यानंतरही सत्ताधारी पक्षासह विरोधी खासदारही ईयूशी झालेल्या करारावर सहमत नाहीत. लेबर पार्टी आणि डेमॉक्रॅटिक युनियनिस्ट पार्टीने म्हटले आहे की, आम्ही या कराराच्या विरोधात मतदान करू. सभागृहात आयर्लंडचे शॅडो सेक्रेटरी टोनी लॉइड म्हणाले की, आम्ही या मतदानाला पाठिंबा देणार नाही.
लंडनमध्ये बीबीसीच्या राजकीय संपादक लॉरा कुएन्सबर्ग यांच्या मते, थेरेसा मे यांनी खासदारांना मतदान दोन भागांत विभागून समजून घेण्याचे आवाहन केले आहे. मतदानाच्या पहिल्या भागात ब्रिटनचे ईयूतून बाहेर पडण्याचे महत्त्व समजून घ्यावे आणि नंतर जे मतदान होईल तेव्हा त्याबाबत भविष्यात विचार करावा. मात्र, सभागृहात मतदानाच्या वेळी युरोपियन युनियनसोबत झालेल्या करारांवर खासदारांचे एकमत होईल की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. याआधीही हाऊस ऑफ कॉमन्समध्ये थेरेसांच्या ब्रेक्झिट योजनेच्या ८ संभाव्य पर्यायांच्या विरोधात मतदान झाले होते. कुठल्याही पर्यायाला मतदान होत असताना बहुमत मिळाले नव्हते.
या वर्षी जानेवारीतही संसदेत मतदानासाठी हा करार ठेवण्यात आला होता तेव्हा हा ऐतिहासिक करार २३० मतांच्या फरकाने फेटाळला होता. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये कराराच्या बाजूने २०१ मते तर विरोधात ४३२ मते पडली होती. ईयूसोबत थेरेसा मे यांच्या २ वर्षांच्या वाटाघाटीनंतर जो करार झाला आहे त्यावर खासदारांचा हा निर्णय समजला जाईल. हे मतदान खूप महत्त्वाचे मानले जात आहे. खासदारांनी बिल फेटाळले तर ब्रिटनला २९ मार्चला कराराशिवाय युरोपियन संघटनेतून बाहेर पडावे लागेल किंवा त्याचा कालावधी वाढवला जाईल. जर त्यांनी कराराला पाठिंबा दिला तर ब्रिटनला २९ मार्च रोजी युरोपियन युनियनमधून बाहेर पडावे लागेल.
पंतप्रधान थेरेसा मे यांनी बुधवारी म्हटले होते की, ब्रेक्झिटचा माझा करार तिसऱ्या प्रयत्नात मंजूर झाला तर मी पद सोडेन. थेरेसांचा ब्रेक्झिटबाबतचा करार संसदेने आधीच दोनदा फेटाळला आहे. आता त्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या बंडखोरांना आपल्या बाजूने करण्याचा शेवटचा प्रयत्न करत आहेत. थेरेसांनी या पक्षांच्या खासदारांच्या बैठकीत म्हटले की, नवीन नेत्याला भविष्यात ईयूसोबत नवे संबंध प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करता यावी म्हणून माझ्या योजनेला मंजुरी मिळाल्यास मी पद सोडेन.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.