आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कंपनीने सेक्शुअल अॅक्टिव्हीटीसाठी कर्मचाऱ्यांना दिली सुट्टी, सांगितले यामागचे विचित्र कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनच्या एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना एक अशाप्रकारच्या सुट्टीची ऑफर दिली आहे जी ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. मिररच्या रिपोर्टनुसार या कंपनीने नवीन फरमान जारी करत सांगितले आहे की, कंपनीचे कर्मचारी सेक्शुअल अॅक्टिव्हीटीसाठी सुट्टी किंवा कंपलसरी ऑफ घेऊ शकतात. या आदेशानंतर कंपनीची जगभरात चर्चा होत आहे.


खूपच चकीत करणारे आहे कारण....
- आपल्या या निर्णयामागे कंपनीने एका सर्व्हेचा अहवाल दिला आहे. फॅशन आणि पर्सनल केअर प्रॉडक्टची ऑनलाइन विक्री करणाऱ्या या कंपनीने सांगितले आहे की, कर्मचारी सेक्शुअली सॅटिस्फाईड असतील तर त्यांच्या कामाची प्रॉडक्टीव्हीटी वाढेल. सरळ सांगायचे झाले तर, सेक्शुअली सॅटिसफेक्शनचा प्रभाव ताणतणावात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर न होता थेट कंपनीच्या नफ्यावर होईल. 

 

काय म्हणतो सर्व्हे
> अहवालाच्या मते, कंपनीने हा सर्व्हे आपल्या भागीदार कंपनीसोबत मिळून केला आहे, यामध्ये समोर आले आहे की, सेक्शुअली सॅटिस्फाईड असणारे लोक त्यांच्या कामाच्या ठिकाणी चांगल्याप्रकारे काम करण्यास सक्षम असतात. मग कर्मचारी अविवाहित असो किंवा विवाहित.

> यामुळे कंपनी कर्मचाऱ्यांना एक प्रयोग म्हणून खास सुट्टी देण्यास इच्छुक आहे, जेणेकरून ते आनंदी राहतील आणि तणावमुक्त काम करू शकतील.

 

2 हजार लोकांवर करण्यात आला सर्व्हे 

> 2 हजार लोकांवर सर्व्हे केल्याचे अहवालात सांगितले आहे.

> सेक्शुअल सॅटिसफेक्शनमुळे आनंद मिळतो आणि कामात मन रमत असल्याचे 78 टक्के लोकांचे म्हणणे आहे. 

> 40 टक्के लोक असे मानतात की सेक्शुअल सॅटिसफेक्शनमुळे व्यक्ति तणावमुक्त होऊन नवीन कल्पनांचा विचार करू शकतो.  

बातम्या आणखी आहेत...