आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्युनरल होममध्ये घुसून मृतदेहावर केला बलात्कार; पोलिसांनी रंगेहात पकडले, आत होते इतके भयंकर दृश्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनच्या बर्मिंघम औद्योगिक शहरात बलात्काराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका माथेफिरुने फ्युनरल होममध्ये घुसून 9 मृतदेहांचे विद्रूपीकरण केले. तसेच एका मृतदेहावर बलात्कार केला. ही घटना मृतदेहांवर अंत्यविधी पार पाडणाऱ्या एका इंग्लिश समुदायाचे हॉलमध्ये (फ्युनरल होम) रात्री उशीरा दीड वाजता घडली आहे. या नराधमाने माणुसकीच्या सर्वच संवेदना दुखावल्या आहेत अशा शब्दात न्यायाधीशांनी या घटनेचा निषेध केला. सोबतच, आरोपीला 6 वर्षांची कैद सुनावली आहे.


ताबूतमधून काढले दोन महिलांचे मृतदेह, एकाचे कपडे काढले
आरोपी कासिम खुर्रम (23) एक चोरटा आहे. बर्मिंघमच्या फ्युनरल होममध्ये रात्री एक वाजेच्या सुमारास चोरी झाल्याचा अलार्म वाजला. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. पोलिसांनी कोर्टात सांगितल्याप्रमाणे, फ्युनरल होममध्ये एकूणच 9 मृतदेह अंत्यसंस्कारासाठी शवपेटीत ठेवण्यात आले होते. ते सर्वच ताबूत आरोपीने उघडले आणि त्यापैकी तीन महिलांचे मृतदेह चक्क शवपेटीतून बाहेर काढले. यात एका महिलेचा कफन चेहऱ्यापासून उघडला होता. दुसऱ्या महिलेच्या मृतदेहाचा कफन खालून उघडलेला आणि अर्धनग्न अवस्थेत होता. तर तिसऱ्या मृतदेहावरील कपडा पूर्णपणे काढण्यात आला होता. एका मृतदेहाच्या गालावर जखमा सुद्धा दिसून आल्या.


नशेत तर्र होता आरोपी...
पोलिसांनी कासिमला वेळीच अटक करून त्याची चौकशी केली. सुरुवातीला त्याने काहीही सांगण्यास नकार दिला. परंतु, मृतदेहांची न्यायवैद्यक तपासणी आणि आरोपीची डीएनए चाचणी घेतल्यानंतर सत्य समोर आले. तेव्हा आरोपीने आपल्या पाशवी कृत्याची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो ड्रग्स आणि दारुच्या नशेत तर्र होता. तशाच अवस्थेत तो चोरी करण्यासाठी फ्युनरल होममध्ये घुसला. मृतदेहांसोबत गाडल्या जाणाऱ्या वस्तू चोरण्यासाठी त्याने एक-एक करून सर्वच ताबूत उघडले. या दरम्यान त्याला काही महिलांचे मृतदेह सापडले. यापैकीच एका महिलेच्या मृतदेहावर त्याने बलात्कार केला. तसेच इतर मृतदेहांचे विद्रूपीकरण केले. सुरुवातीला पोलिसांनी मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेऊन तो दिवाळखोर आहे का याची चौकशी केली. परंतु, तो मानसिक रुग्ण नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली.

बातम्या आणखी आहेत...