आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणच्या ताब्यात ब्रिटनचे जहाज, १८ भारतीय अडकले, भारत इराणच्या संपर्कात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेहरान-ब्रिटनचा राष्ट्रध्वज असलेल्या तेल जहाजाला इराणने ताब्यात घेतले आहे. बंदर अब्बास येथे इराणने ही कारवाई केली आहे. त्यावरून आंतरराष्ट्रीय राजकारण तापले आहे. या जहाजावर १८ भारतीय कर्मचारी असून तेही या कारवाईत अडकल्याचे सांगण्यात येते. सर्व कर्मचाऱ्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. 


बंदर अब्बास सागरी क्षेत्रात ब्रिटनचे टँकर स्टेना इम्पेराेची एका मासेमारी करणाऱ्या बाेटीशी टक्कर झाली हाेती. इराणच्या कायद्यानुसार अपघातानंतर त्यामागील कारणांचा शाेध घेण्यासाठी तपास करणे अनिवार्य ठरते, असे हाॅर्माेझगान प्रांतीय बंदराचे संचालक ए. माेराद अफिपूर यांनी सांगितले. अपघात झाल्यानंतर मासेमारी बाेटीद्वारे ब्रिटनच्या नाैकेशी संपर्काचा प्रयत्न करण्यात आला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हाॅर्माेझगन बंदराशी संपर्क करावा लागला. इस्लामिक रिव्हाॅल्यूशनरी गार्डनेदेखील स्टेना जहाजाला चाैकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याच्या वृत्तास दुजाेरा दिला आहे. दरम्यान, आम्ही इराणच्या संपर्कात असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. 

 

स्वीडनची मालकी : स्वीडनच्या मालकीच्या स्टेना इम्पेराेमध्ये २३ कर्मचारी असून ते सर्व जहाजात आहेत, असे सूत्रांनी सांगितले. त्यापैकी १८ कर्मचारी भारतीय आहेत. जहाजाचा कॅप्टन व इतर कर्मचारी फिलिपाइन्स, लॅटिव्हा, रशियाचे आहेत.