आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्वतांवर सहा आतंकवादी हातात मशीन गन घेऊन दिसले, तेव्हाच एक किलोमटीर अंतरावरील फौजीने त्यांना पाहिले आणि धोक्याची जाणीव झाली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगानिस्तान. जगभरात आर्मीचे असे काही शुरवीर आहेत, त्यांचे किस्से ऐकूण सर्वच चकीत होतील. अमेरिकेतील सैन्यातील एका जवानाचा असाच एक किस्सा आहे. त्याने एकाच गोळीने एकाच वेळी सहा आतंकवाद्यांचा खात्मा केला होता. त्याने एक किलोमीटर अंदरावरुन आतंकवाद्यांवर निशाना साधला होता. 2013 मध्ये अफगानिस्तानमध्ये घडलेल्या या घटनेविषयी अमेरिकेतील सैन्याने हैराण करणारी कथा सांगितली होती.

 

- 2013 मध्ये अमेरिकेतील सैन्य अफगानिस्तानमध्ये डिप्लॉय करत होते. येथे सेना अनेक आतंकवाद्यांचा सामना करत होती. दक्षिण अफगानिस्तानच्या ककारनच्या एका पाहाडावर एक अमेरिकी सैन्याचा स्नाइपर बसलेला होता आणि जवळच एक किलोमीटरच्या अंतरावर सहा आतंकवादी त्याच्याकडे येत होते. 

 

फौजीच्या नजरेस पडले दहशतवादी 
- पाहाडांवर बसलेल्या स्नाइपरने पाहिले की, एका आतंकवाद्याने सुसाइड जॅकेट घातले आहे. त्याला कळाले की, जर त्याने या आतंकवाद्याला येथेच थांबवले नाही, तर त्याच्या सोबतींचे प्राण धोक्यात जातील. त्या सहा जवानांच्या हातात मशीन गन असल्याचे या 20 वर्षांच्या फौजीने पाहिले. 

 

मग एका गोळींनेच केला सर्वांचा खात्मा 
एक्सपर्ट्सने सांगितले की, ऐवढ्या लांबून निशाना साधणे खुप कठीण काम असते. टारगेट हालचाल करत असेल तेव्हा हे अजून जास्त अवघड असते. स्नाइपरने पुर्ण लक्ष केंद्रीत केले तेव्हा त्याला आतंकवाद्याच्या जॅकेटवर एक बटन दिसले. हे बटन जॅकेटमध्ये लावल्या बॉम्बचे असल्याचे स्नायपरला कळाले. हे बटन दाबदाच स्फोट होतो. स्नायपरने उशीर न करता निशाना साधला आणि त्याच्या बंदूकमधून निघालेली ती गोळी त्याच्या शरीराच्या आरपार गेली. गोळी त्या बटनवरील जॅकेटला लागताच एक स्फोट झाला आणि त्याच्यासोबतच्या पाचही आतंकवाद्यांचाही खात्मा झाला. 

 

या गनचा केला वापर 
आर्मीने सांगितले की, 20 वर्षांच्या या फौजीने जगातील सर्वात शक्तीशाली L115A3 नामक गनचा वापर केला. त्याने 900 मीटर म्हणजेच जवळपास 1 किलोमीटरच्या अंतरावरुन टार्गेटला मारले होते. तर आतंकवाद्याने 20 किलोचे स्फोटक जॅकेट घातलेले होते. आर्मीने सांगितले की, या तरुण स्नायपरने यापुर्वी तालिबानमध्ये जवळपास दिड किलोमीटरच्या अंतरावरुन एका आंतकवाद्याला मारले होते. 
 

बातम्या आणखी आहेत...