Home | International | Other Country | British soldiers left for Antarctica's 1500km yacht

अंटार्क्टिकाच्या1500 किमी यात्रेवर निघाला ब्रिटिश सैनिक

वृत्तसंस्था | Update - Nov 10, 2018, 10:19 AM IST

आजपर्यंत अंटार्क्टिकाची मोहीम कोणीही केली नाही पूर्ण

  • British soldiers left for Antarctica's 1500km yacht

    अंटार्क्टिका -ब्रिटनचे कॅप्टन लुईस रूड ७५ दिवसांच्या अंटार्क्टिकाच्या पोलर क्षेत्राच्या १५०० किमीच्या प्रवासावर निघाले. या मोहिमेवर लुईस एकटेच जात आहेत. त्यांना मदत करणारा किंवा त्यांचे साहित्य सांभाळणारा सोबत कोणीही असणार नाही. थोडक्यात हे सोलो मिशन आहे.
    १५० किलो ओझे सोबत घेऊन ते पूर्ण प्रवास करतील. या भागात उणे ५० अंश सेल्सियसपर्यंत तापमान असते. आजवर कोणीही ही मोहीम पूर्ण करू शकला नाही. ४७ वर्षांचे कॅप्टन लुईस, त्यांचे मित्र लेफ्टनंट कर्नल हेन्री वोर्सले यांच्या स्मरणार्थ या प्रवासावर निघाले आहेत.

    वास्तविक पाहता लुईस आणि हेन्री या दोघांनाही गिर्यारोहणाचा छंद होता. २०११ मध्ये लुईस जेव्हा पहिल्यांदा गिर्यारोहणासाठी सज्ज झाले तेव्हा हेन्री यांनी त्यांंना मार्गदर्शन केले होते. २०१६ मध्ये हेन्री यांनी अंटार्क्टिकाच्या मोहिमेवर एकटेच निघाले तेव्हा वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मित्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता लुईसही या मोहिमेवर निघाले. अंटार्क्टिका मोहिमेला गिर्यारोहणाच्या क्षेत्रातील शॅकलटन मोहीम संबोधले जाते.

    मुळात शॅकलटन हे गिर्यारोहक होते. सर्वप्रथम १९१४ मध्ये ते अंटार्क्टिका मोहिमेवर पूर्ण नाव घेऊन गेले होते. यावर २८ लोक बसले होते. रस्त्यातच मोठे वादळ आले. शॅकलटन मोहीम पूर्ण करू शकले नाहीत, पण सर्व २८ लोकांना वाचवण्यात त्यांना यश आले. तेव्हापासूनच या मोहिमेला शॅकलटन मोहीम संबोधले जाते. कॅप्टन रूड म्हणाले की, जी मोहीम शॅकलटन आणि माझे मित्र पूर्ण करू शकले नाहीत ती मोहीम आता मी पूर्ण करू इच्छितो. मी गेल्या ३० वर्षांपासून सैन्यात आहे. तरीसुद्धा मी मागील ४ महिन्यांपासून या प्रवासासाठी प्रशिक्षण घेतले आहे. २५ ऑक्टोबरपासून अंटार्क्टिकासारख्या वातावरणात मी एकटा राहत असल्याचे ते म्हणाले. १ तारखेपासून बेस कॅम्पवर बसून पुढे आगेकूच करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Trending