आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१५० वर्षे जुन्या विहिरीत ब्रिटिशकालीन सहा बंदुका व एक तलवार सापडली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 बांदा - उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात महोखर गावात १५० वर्षे जुन्या विहिरीत ६ बंदुका व एक तलवार आढळली. ही शस्त्रे ब्रिटिशकालीन असल्याचे सांगण्यात येते.एएसपी भरतकुमार पाल म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात ‘विहिरी व तलाव पुनरुज्जीवन’ मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार सर्व तलाव व विहिरी स्वच्छ केल्या जात आहेत. शुक्रवारी ८ मजूर महोखर गावातील एका विहिरीतील गाळ काढण्याचे काम करत होते. तेव्हा त्यांना बंदुका व तलवार सापडली. मजुरांची उत्सुकता वाढली. त्यांनी आणखी खोदकाम सुरू केले असता, पितळेचा एक कलश व एक लोटा सापडला. पोलिसांनी सर्व साहित्य जप्त केले आहे.