आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेदरलँड : ब्रिटनच्या पर्यटकाने ऑनलाइन खोली नोंदवली, तेथे गेल्यावर शिपिंग कंटेनर निघाले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅम्सटरडॅम - ब्रिटनमधील पर्यटक बेन स्पेलर यांनी नेदरलँडच्या अॅम्सटरडॅम येथे एक दिवस राहण्यासाठी हॉटेलमध्ये ऑनलाइन खोली आरक्षित केली होती. स्पेलर प्रत्यक्षात जेव्हा तेथे गेले  तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण ती हॉटेलची खोली नव्हती तर रस्त्याच्या कडेला ठेवलेले शिपिंग कंटनेर होते. नंतर बुकिंग करणाऱ्या कंपनीने आपली चूक मान्य करत दंडासह रक्कम परत केली. स्पेलर यांनी खोलीसाठी १०० पाऊंड (सुमारे ९ हजार रुपये) दिलेले होते. एअरबीएनबी लॉजिंग्ज यांनी आरक्षित करतेवेळी खासगी बाथरुमसह स्वच्छ खोली असल्याचे सांगितले होते. त्यांनी साेशल मीडियावर लिहिले, माझी फसवणूक करण्यात आलेली होती. कंटेनरमध्ये जमिनीवर गादी अंथरलेली होती. एक कांबळ होती आणि एक छोटे बाथरुम होते. तीनवेळा कंटेनरसमोरून गेलो परंतु मला अशा जागेत थांबावे लागणार आहे, यावर विश्वास बसत नव्हता. तक्रारीनंतर एयरबीएनबी कंपनीने स्पेलर यांना ९ हजार रुपये परत केले. त्यानंतर लगेच अन्य हॉटेलात थांबण्यासाठी २३० डॉलरही (सुमारे २० हजार रुपये)दिले. त्या हॉटेलचे नावही यादीतून काढले.