Home | International | Other Country | British TV Anchor dies after Failed Brazilian bum lift operation in Turkey

सुंदर दिसण्याच्या नादात टीव्ही अँकरचा मृत्यू, परदेशात Bum Lift सर्जरीने घेतला जीव

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 30, 2018, 12:30 PM IST

29 वर्षीय लिया हिने तुर्कीत एका तज्ज्ञाकडून सुंदर नितंबांसाठी ब्राझीलियन बम लिफ्ट सर्जरी केली होती.

 • British TV Anchor dies after Failed Brazilian bum lift operation in Turkey

  लीड्स - इंग्लंडच्या लीड्समध्ये राहणाऱ्या एका टीव्ही अँकरचा सुंदर दिसण्याच्या नादात जीव गेला आहे. 29 वर्षीय लिया हिने तुर्कीत एका तज्ज्ञाकडून सुंदर नितंबांसाठी ब्राझीलियन बम लिफ्ट सर्जरी केली होती. तिने आपल्या बॉडी पार्टचा आकार वाढवण्यासाठी झालेल्या सर्जरीवर 3 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च केला होता. परंतु, ही सर्जरी बिघडली आणि ऑपरेशन सुरू असताना अचानक तिची प्रकृती बिघडली आणि तिचा मृत्यू झाला.


  अनेक सेलिब्रिटींनी येथूनच केली सर्जरी
  रिपोर्ट्सनुसार, टीव्ही अँकर लियाने कॉस्मेटिक सर्जरी एका सेलिब्रिटी सर्जरी सेंटरमधून केली होती. त्याच ठिकाणी यापूर्वी अनेक मॉडेल्स आणि अभिनेत्रींनी सर्जरी केली होती. परंतु, त्यापैकी कुणीही अद्याप सर्जरीबाबत तक्रार केली नाही. त्यामुळे, लियाच्या प्रकरणात नेमके काय झाले आणि तिचा मृत्यू कसा झाला असा प्रश्न सर्वांना पडला आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार इंग्लंडवरून तुर्कीत गेलेल्या या मॉडेलची सर्जरी पूर्ण झाली होती. सर्जरीनंतर तिने आपला फोटो सुद्धा शेअर केला होता. बम लिफ्ट झाल्यानंतर तिला त्रास झाला आणि त्याची तक्रार तिने त्या क्लिनिककडे केलीच नाही. अशात तिच्या दुर्लक्षामुळे तिचा जीव गेला का याचाही पोलिस तपास करत आहेत.

  पती म्हणाला...
  लियाच्या अचानक निधनाने तिचा पती शॉकमध्ये आहे. स्कॉटने म्हटले, की "मला विश्वास बसत नाही की दोन दिवसांपूर्वी अगदी सामान्य दिसणारी माझी पत्नी या जगात नाही. नुकतेच मी तिला व्हिडिओ कॉल करून बोललो होतो. आता तोच व्हिडिओ कॉल पुन्हा-पुन्हा पाहून मी रडत असतो." हे दोघे लिव्ह इनमध्ये राहत होते आणि ती परतल्यानंतर लग्न करणार होते. काही दिवसांपूर्वीच आपल्या लग्नाच्या तयारीत राहिलेल्या स्कॉटला आता तिच्या दफनविधीची तयारी करावी लागत आहे.


  क्लिनिकचे काय म्हणणे आहे..?
  ज्या क्लिनिकमध्ये लियाने सर्जरी केली त्या ठिकाणी स्पष्ट माहिती देण्यात आली होती. बम लिफ्ट करत असताना पोट आणि मांड्यांचे फॅट कापून नितंबांमध्ये लावले जाते. या सर्जरीसाठी किमान 2 तास लागतात. वेबसाइटवर सुद्धा सर्जरी करण्यासाठी येणाऱ्यांना सतर्क केले जाते, की सर्जरी केल्यानंतरही त्याचा धोका कायम असतो.

 • British TV Anchor dies after Failed Brazilian bum lift operation in Turkey

Trending