आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात फिरायला आलेली विदेशी महिला करून घेत होती मसाज, युवक बलात्कार करून झाला फरार...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंडीगढ- इंग्लंडवरून भारतात फिरायला आलेल्या एका महिलेवर चंडीगढच्या एका हॉटलमध्ये बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. अंदाजे 50 वर्ष वय असलेल्या महिलेने आरोप लावला आहे की, मसाज करताना स्टाफने तिच्यावर बलात्कार केला.

 

महिलेच्या तक्रारीनंतर चंदिगढ पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. पिडीत महिला 19 डिसेंबरला चंदिगढला आपल्या साथिदारासोबत आली होती. येथे ती स्पामध्ये मसाज घेत होती तेव्हा स्टाफ मेंबरने तिच्यावर बलात्कार केला.

 

पोलिस घटनेची चौकशी करत आहेत, आरोपीचे वय 28 असल्याचे कळाले आहे. घटना 20 डिसेंबरची आहे, जेव्हा महिला आपल्या जोडिदारासोबत टुरीस्ट वीजावर भारतात फिरायला आली होती. ती चंदीगडच्या एका हॉटेलमध्ये थांबली होती आणि तेथे तिच्यावर मसाज करणाऱ्या युवकाने बलात्कार केला.

 

पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि लवकरच आरोपीला पकडण्यात येईल.

 

बातम्या आणखी आहेत...