आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलाही आता युद्धकौशल्य सिद्ध करताहेत : ब्रिटनच्या पहिल्या महिला मेजर जनरल सुझान रिज यांचे मत 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतात सैन्यात महिलांना प्रत्यक्ष लढण्याची जबाबदारी दिली जावी की नाही यावरून चर्चा सुरू आहे. ब्रिटनच्या पहिल्या महिला मेजर जनरल सुझान रिज यांनी मात्र महिलांना लढावू भूमिका दिली जावी, त्या युद्धाच्या मैदानावरही कौशल्य पणास लावतील, असा विश्वास व्यक्त केला. 


ब्रिटनच्या लष्करात अलीकडेच मोठे परिवर्तन झाले आहे. ब्रिटनच्या लष्करात उच्च अधिकारी पदावर भरती झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत. त्यात मेजर जनरल रँकपर्यंत पोहोचणाऱ्या पहिल्याच महिला आहेत. १९९२ मध्ये त्या सैन्याच्या लिगल सर्व्हिसमध्ये रुजू झाल्या होत्या. तेथे त्यांनी २६ वर्षे सेवा बजावली. त्यानंतर ते महासंचालक पदापर्यंत मजल मारू शकल्या. येथील एका परिसंवादात सुझान यांनी सैन्यातील महिलांच्या सहभागाबद्दलची आपले मत मांडले. 

 

पुरुष सैनिकांत एकटी महिला 
१९९२ मध्ये इन्फट्रीं बटालियनसोबत त्यांना पाठवण्यात आले होते. तेव्हा त्यांच्या युनिटमध्ये सर्व पुरुष सैनिक तसेच अधिकारी होते. त्या एकट्याच महिला होत्या याची आठवण त्यांनी काढली. सैन्यातील अडीच दशकांचा प्रदीर्घ कालखंड अतिशय रोमांचक व आव्हानात्मक होता. याच काळात युद्धकौशल्य व प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली होती. त्याचा लाभ घेतला, असे त्यांनी सांगितले. त्या परिस्थिती संघर्ष करून स्वत:ला सिद्ध करून दाखवल्याची आठवण त्यांनी सांगितली. ब्रिटनमध्ये आता बदल होत आहे.

 

गतवर्षीपासून मोठा बदल स्वत:ला सिद्ध करण्याची संधी 
ब्रिटिश सैन्याने या दिशेने मोठी पावले उचलली आहेत. गत नाताळपासून इन्फंट्री व आर्म्ड कोरमध्येही महिला सैनिक तसेच अधिकाऱ्यांची भरती सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत रॉयल इंजिनिअर्स, लॉजिस्टिक्स, सिग्नल इत्यादी काेरमध्ये महिला पूर्वीपासून काम करत आल्या आहेत. महिला अगोदर आपली भूमिका मर्यादित आहे असे मानत, मात्र आता भूदलात महिला युद्ध आघाडीचे नेतृत्वदेखील करू लागल्या आहेत. महिलांना ही चांगली संधी आहे. ही संधी घेऊन महिलांनी स्वत:ला सिद्ध केले पाहिजे. महिलांना नव्या भूमिकेसाठी काही वेगळी सुविधा देण्यात आलेली नाही. पुरुषांसाठी असलेल्या मापदंडावरच त्यांना स्वत:ला सिद्ध करावे लागते, असे रिज यांनी सांगितले. 
 

बातम्या आणखी आहेत...