आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबोकारो - झारखंडच्या बोकारो जिल्ह्यात एका प्रसिद्ध डॉक्टराने कोट्यधींच्या इमारतीवर अवैध ताबा मिळवण्यासाठी फिल्मी स्टाइल षडयंत्र रचला. ज्या इमारतीमध्ये त्याने भाड्यावर क्लिनिक उघडले होते त्याच घराचे मालक असलेल्या भाऊ-बहिणीला त्याने एका खोलीत 2 वर्षे वेठीस धरले. या धक्कादायक प्रकरणाचा खुलासा झाला तेव्हा घटनास्थळी अतिरिक्त पोलिस महासंचालक अनिल पालटा शनिवारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनीच दोघे भाऊ बहिण मंजूश्री घोष (56) आणि दीपक घोष (50) यांना मुक्त केले. उल्लेखनीय बाब म्हणजे, एडीजी पालटा आणि मंजुश्री एकाच शाळेत शिकले आहेत. त्यांनी या दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेतील मुख्य आरोपी डॉक्टर डीके गुप्ता आणि त्याचा सहकारी मंतोष गुप्ता यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आरोपी मंतोषचा 2 महिन्यांपूर्वी मृत्यू झाला.
आधी भाड्यावर घेतले, मग असा रचला षडयंत्र
मंजूश्रीचे वडील एसके घोष बोकारो स्टील प्लान्टमध्ये अधिकारी होते. 1971 मध्ये त्यांना को-ऑपरेटिव कॉलोनीत प्लॉट क्रमांक 229 देण्यात आला. या प्लॉटवर इमारत बांधून ते आपल्या पत्नी आणि मुला-मुलींसोबत राहत होते. 2001 मध्ये मंतोष गुप्ताने या प्लॉटचा एक भाग भाड्यावर घेतला. त्या ठिकाणी नेत्र चिकित्सालय आणि चषम्याचे दुकान उघडले. या क्लिनिकवर डॉ. डीके गुप्ता बसत होता. याच दोघांनी मिळून बहिण मंजूश्री आणि भाऊ दीपक यांना एका खोलीत डांबले. काही दिवसांनंतर दीपकला त्या दुकानात नोकरी देण्यात आली. परंतु, रोज दुकान बंद होताच त्याला पुन्हा त्या खोलीत डांबून ठेवले जात होते. यानंतर आरोपी डॉक्टरने जिवे मारण्याच्या धमक्या देऊन घराच्या कागदपत्रांवर दोघांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. शेजारीच राहणाऱ्या पूर्णेंदू कुमार सिंह यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली आणि दोघांची सुटका केली. एडीजी पालटा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून याचा तपास पोलिस अधीक्षकांकडे सोपविला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.