Home | National | Other State | Brother Ashok Meena Died In Road Accident Before Sisters Marriage Family Waiting For Baraat

बहिणीच्या हातात रचली होती मेंदी, काही वेळातच येणार होते वऱ्हाड; पण त्यापूर्वी आलेल्या एका बातमीने लग्नमंडपात परसली भयान शांतता

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 15, 2019, 03:04 PM IST

बाजारातून सामान आणण्यासाठी गेला होता तो, पण वाटेतच मृत्यूने गाठले

  • Brother Ashok Meena Died In Road Accident Before Sisters Marriage Family Waiting For Baraat

    जयपूर (राजस्थान) - शनिवारी येथे पिकअपने दिलेल्या धडकेत करूण अंत झाला. अशोक मीणा असे मृताचे नाव आहे. अशोकच्या बहिणीची शनिवारी लग्न होते. यामुळे अशोक लग्नाचे सामान घेऊन घरी जात होता. मागून येणाऱ्या एका पिकअपने त्याला धडक दिली.

    मिळालेल्या माहितीनुसार, धडकेनंतर अशोक खाली पडला आणि पिकअपचे मागचेचाक त्याच्या डोक्यावरून गेले. यामुळे अशोकचा जागेवरच मृत्यू झाला. अपघातानंतर पिकअप चालक फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचे पोस्टमार्टम करून कुटुंबीयांच्या स्वाधीन केला.


    बघतच राहिले लोक, लग्नपंडपात पसरली भयान शांतता

    अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित लोकानी बघ्यांची भूमिका घेतली होती. 20 मिनिटांपर्यंत कोणीच युवकाकडे लक्ष दिले नाही. यानंतर कोणीतरी आपला टॉवेल मृतदेहावर टाकला. लोक पोलिस येण्याची वाट पाहात होते. इकडे घरात लग्न असल्यामुळे आनंदाचे वातावरण होते. घरी वरातीच्या स्वागताची तयारी सुरू होती. तेवढ्याच अशोकच्या निधनाची वार्ता घरी पोहोचली. यानंतर लग्नमंडपात भयान शांतता पसरली. अशोकचा मृतदेह घरी आणताच सगळ्यांनी एकच टाहो फोडला. अशोकला 4 बहिणी आणि एक लहान भाऊ आहे. तीन बहिणींचे लग्न झाले आहे.

Trending