Home | National | Madhya Pradesh | Brother death of raksha bandhan day in road accident

रक्षाबंधनानंतर बाइकवरून जात होते बहीण-भाऊ, तेवढ्यात झाला भीषण अपघात; 5 वर्षांचा चिमुरडा चिरडला, भावाची मृत्यूशी झुंज

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 29, 2018, 04:12 PM IST

इकडे ट्रकच्या चाकाखाली चिरडून 5 वर्षांचा एकुलत्या एक मुलाने दम तोडला, तर दुसरीकडे मृत्यूशी संघर्ष करणारा भाऊ.

 • Brother death of raksha bandhan day in road accident

  इंदूर - इकडे ट्रकच्या चाकाखाली चिरडून 5 वर्षांचा एकुलत्या एक मुलाने दम तोडला, तर दुसरीकडे मृत्यूशी संघर्ष करणारा भाऊ. जवळच आकांत करणारी बहीण सुनीता. मुलाच्या मृत्यूमुळे आक्रोशित, परंतु किमान भावाला तरी वाचवावे म्हणून मदतीसाठी विनवणी करणारी. यासाठी ती ओरडून-ओरडून लोकांना म्हणत होती- माझा मुलगा तर गेला, पण भावाला तरी वाचवा हो! शेवटी लोकांनी तिची मदत केली. पोलिस आणि 108 अॅम्ब्युलेन्सला फोन करून बोलावले आणि भावाला एमवाय रुग्णालयात पाठवले, तेथे त्याची प्रकृती गंभीर आहे.

  महिलेच्या मांडीवरून उसळून पडला मुलगा, ट्रकच्या चाकाखाली चेंदामेंदा
  ही घटना मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता तलावली चांदा मेन रोडवर घडली. पोलिस अधिकारी संतोष दूधी म्हणाले की, दिनेश रक्षाबंधनानंतर बहीण सुनीता आणि भाचा आयुषला बाइकवरून इंदुरातील रेशम केंद्र स्थित तिच्या सासरी सोडण्यासाठी जात होता. रुचि सोया फॅक्टरीजवळ त्याची बाइक रस्त्यातील खड्ड्यामुळे स्लीप झाली. तेवढ्यात फॅक्टरीतून निघणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडले. या अपघातात सुनीता उसळून रस्त्याच्या कडेला पडली आणि तिच्या मांडीवर बसलेला आयुष ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला. दिनेशही ट्रकशी धडकला. यामुळे त्याला गंभीर जखमा झाल्या आहेत.


  डोळ्यांदेखत गेला मुलगा, तरीही सुनीताने सोडला नाही धीर
  एकुलता एक मुलाचा डोळ्यांदेखत मृत्यू पाहूनही सुनीता खचली नाही. तिने आरडाओरड करून लोकांना भावाचा जीव वाचवण्यासाठी विनंती केली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. कांस्टेबल धर्मेंद्र म्हणाले- महिला जखमी भावाच्या जवळच बसून होती. आधी वाटले तरुणाचा मृत्यू झाला आहे. परंतु त्याचा श्वास सुरू होता. महिला म्हणाली की, माझा मुलगा तर गेला, पण माझ्या भावाला तरी हॉस्पिटलमध्ये पाठवा. यानंतर तरुण आणि महिलेला लोकांनी हॉस्पिटलमध्ये पाठवले. आयुषचा मृतदेह पोत्यात भरून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. पोलिसांनी ट्रकचालकाला पकडले. दिनेशला गंभीर अवस्थेत सर्जिकल आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.

  पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेचे आणखी Photos...

 • Brother death of raksha bandhan day in road accident
 • Brother death of raksha bandhan day in road accident
 • Brother death of raksha bandhan day in road accident

Trending