भाऊ घरात नसताना / भाऊ घरात नसताना दिराने केला भावजयीवर बलात्कार, घटना कळताच पतीनेही दिला तलाक

दिव्य मराठी वेब टीम

Oct 30,2018 12:00:00 AM IST

नवी दिल्ली - दिल्लीतील एका मशिदीच्या इमामच्या भावाने मुझफ्फरनगरच्या धानदेडा गावात आपल्या भावजयीवर कथितरीत्या बलात्कार केला. नंतर महिलेच्या पतीने तिला तलाकची नोटीस पाठवली. मैनुद्दीन पोलिस स्टेशनचे प्रभारी जितेंद्र कुमार म्हणाले की, ही घटना रविवार (28 ऑक्टोबर) रोजी घडली आहे. महिलेने आरोपीला विरोध केल्यावर तिला घरात बेदम मारहाण झाली. आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.

दिरानेच केला भावजयीवर बलात्कार
सूत्रांनुसार, घटनेच्या वेळी पीडितेचा पती घरात नव्हता. पोलिस अधिकारी म्हणाले, महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. पीडितेच्या भावाच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. घटनेनंतर इमामाने पत्नीला तलाकची नोटीसही पाठवली आहे.

पत्नीवर बलात्काराची माहिती मिळताच पतीने दिला तलाक
एका रिपोर्टनुसार, दिल्लीच्या एका मशिदीत इमामत करत असलेल्या इमामाचे गतवर्षीच पीडितेशी लग्न झाले होते. इमाम जेव्हा दिल्लीत होता तेव्हा त्याचा भाऊ धानदेडा गावात आला आणि भावजयीवर कथितरीत्या बलात्कार केल्याचा आरोप होत आहे. यानंतर पतीला घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्याने पीडितला तलाक दिला.

X
COMMENT