आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक: लग्नाच्या 3 महिन्यांनीच दिराने केला रेप, नवऱ्याने बायकोला बदडून घराबाहेर काढले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बरेली (यूपी) - उत्तर प्रदेशातून अत्यंत लाजिरवाणे प्रकरण उजेडात आले आहे. येथे लग्नानंतर महिला सासरी गेल्यावर 3 महिन्यांनीच मोठ्या दिराने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने ही घटना आपल्या पतीला सांगितली, तर त्याने तिलाच बेदम मारून घराबाहेर हाकलून लावले. आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाईसाठी ती पोलिसांत गेली, तर पोलिसांनीच तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले. 

> यानंतर पीडितेने हेल्पलाइन क्रमांक 181वर तक्रार दिली, तेव्हा कुठे 25 दिवसांनी प्रकरणाची दखल घेऊन गुन्हा दाखल झाला. धक्कादायक बाब म्हणजे, अद्यापही पोलिसांनी आरोपीविरुद्ध कोणतीही अॅक्शन घेतलेली नाही.

> गत शनिवारी पीडिता आला हजरत हेल्पिंग सोसायटीच्या अध्यक्षा निदा खान यांच्याकडे गेली आणि न्याय मिळवून देण्याची विनवणी केली. याप्रकरणी निदा खानने राज्याचे मुख्यमंत्री, डीजीपी यांच्याकडे ट्विटरच्या माध्यमातून तक्रार नोंदवली आहे.

 

असे आहे प्रकरण
> सूत्रांनुसार, पीडितेला तिचा पती 20 लाख रुपयांची मागणी करत होता. सासरचेही तिचा भयंकर छळ करू लागले होते. हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने मोठा दीरही पीडितेवर बळजबरी करू लागला. एका दिवशी घरात कोणीही नव्हते, तेव्हा मोठ्या दिराने पीडितेवर बलात्कार केला. नंतर पती घरी परतल्यावर पीडितेने त्याला पूर्ण हकिगत सांगितली, तर पती तिच्यावरच चिडला. महिलेला बेदम मारहाण केली. यामुळे निराश झालेल्या पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न केला, परंतु तिला वाचवण्यात आले. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही. 15 जून रोजी पती आणि मोठ्या दिरासहित सासरच्या मंडळींनी महिलेला बेदम मारून घराबाहेर हाकलून लावले. तिचे सर्व दागिने व इतर सामानही हिसकावून घेण्यात आले.


> याप्रकरणी निदा खान म्हणाल्या की, पोलिसांच्या वेळकाढूपणामुळे आतापर्यंत आरोपींना अटक झालेली नाही. लगेच तक्रार दाखल न झाल्याने आरोपींचा हिंमत वाढली आहे.  

 

बातम्या आणखी आहेत...