Home | National | Other State | Brother In Law Shoots And Killed Chandan Singh After Verbal Fight Daughter Told Police

चिमुकलीसमोर झाला वडिलांचा खून पण तिला काहीच कळाले नाही; पोलिसांना म्हणाली- मामा आणि माउशी आल्यावर मम्मी जोराने बोलत होती...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 12, 2019, 01:33 PM IST

मुलगी म्हणाली- पप्पा पायऱ्यावरून खाली पडले, त्यांच्या डोक्यातून रक्त येत होते

  • Brother In Law Shoots And Killed Chandan Singh After Verbal Fight Daughter Told Police

    वाराणसी(उत्तर प्रदेश)- कँट परिसरातील पहाडिया मंडीच्या मागे मागील बुधवारी एका व्यक्तीचा त्याचाच घरात खून करण्यात आला. घटना होत असाताना व्यक्तीची मुलगी तिथेच उपस्थित होती. पोलिसांना मृत व्यक्तीच्या मेहुण्यावर संशय आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मुलीचा मामा बहिण आणि भाऊजीचा वाद मिटवण्यासाठी आला होता.

    दौलतपूरमध्या राहणाऱ्या 65 वर्षीय लालबहादुर सिंह यांचे पहाडिया मंडीच्या मागे घर आहे. त्यांच्या मुलगा चंदन सिंहचे मउमध्ये राहाणाऱ्या प्रियासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांना एक मुलगी झाली. चंदन आणि प्रियामध्ये तीन चार दिवसांपासून वाद सुरू होता. प्रियाने हा वाद मिटवण्यासाठी आपला भाऊ मृत्युंजय सिंहला बोलावले होते. बुधवारी मृत्युंजय आपले दोन मित्र आणि एका बहिणीला घेऊन आला.

    पोलिसांना संशय आहे की, चंदनला मृत्युंजयने गोळी मारली
    घटनेची माहिती मिळताच लोकांनी एकच गर्दी केली. आसपासच्या लोकांनी सांगितले की, मृत्युंजय आणि त्याच्यासोबत आलेल लोक जास्तीत जास्त 5 मिनीटे घरात थांबले. या 5 मिनीटातच वाद झाला आणि गोळाचा आवाज आला. आरोपींनी घटनास्थळीच पिस्तुल सोडली आणि पळ काढला.

Trending