आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारित्र्याच्या संशयावरून भावाकडून बहिणीचा खून, बार्शीतील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शी - येथील पाटील चाळ येथे माहेरी राहणाऱ्या विवाहित बहिणीचा भावानेच चारित्र्यावर संशय घेऊन खून केल्याची बार्शी येेथे घटना घडली. याप्रकरणी आईने मुलाविरोधात बार्शी पोलिसांत तक्रार दिली आहे. पूजा संदीप गायकवाड (२१, रा. वडगाव शेरी, पुणे, सध्या रा. बार्शी) असे मृत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी मृत तरुणीचा भाऊ सोमनाथ बाळू ओहोळ  याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   


तीन वर्षांपूर्वी पूजा हिचा विवाह झाला होता. तिला दीड वर्षाचा मुलगा असून सहा महिन्यांपूर्वी सासरच्या लोकांनी मृत पूजाच्या चारित्र्यावर संशय घेतला होता. सासरी चांगली वागणूक मिळत नसल्याने पूजा मुलासह माहेरी राहत होती. सदरच्या प्रकारानंतर बहीण-भावांमध्ये सतत भांडणे होत असल्याचे समोर आले आहे.


झोपेतच घेतला जीव 
बुधवार (दि. १३) रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास संशयित आरोपी  सोमनाथ याने पूजा झोपेत असताना तिच्या डोक्यात दगडी पाटा घालून गंभीर जखमी केले. त्यानंतर जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिस मृत विवाहितेच्या पतीसह सासरच्या लोकांचीही चौकशी करणार असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...