Home | Maharashtra | Pune | Brother killed his sister for insurance money

संपत्तीत पैसा मागते म्हणून डोके आपटून बहिणीची हत्या, नंतर गाडीत जळून मृत्यू झाल्याचा बनाव...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 14, 2019, 07:39 PM IST

''सख्खा भाऊ पक्का वैरी...'' या म्हणीची प्रचिती

  • Brother killed his sister for insurance money

    पुणे- संपत्तीत वाटा नको म्हणून बहिणीची डोके आपटून हत्या केल्याची घटना पुण्यातील हिंजवडी भागात घडली आहे. हत्त्या केल्यानंतर लपवण्यासाठी बहिणीला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. तसेच त्यानंतर तिला रुग्णालयात नेताना मोटारीला आग लागून तिचा मृत्यू झाल्याचाही बनाव केला. संगीता मनीष हिवाळे असे हत्या झालेल्या बहिणीचे नाव आहे.पोलिसांनी केलेल्या चौकशीत 8 महिन्यां नंतर अपघाताचा हा बनाव उघड झाला आहे. याप्रकरणी आरोपी भावावर हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात झाला आहे.


    संगीता हिवाळे यांचे पतीशी मतभेद असल्याने त्या मुलांसह आपल्या भावाजवळ राहात होत्या. 9 सप्टेंबरला रात्री 9 वाजताच्या सुमारास आरोपी भाऊ जॉन याचा पैशावरून बहीण संगीताशी वाद झाला त्यामुळे जॉनने संगीताचे डोके फरशीवर आपटले. या घटनेत संगीताचा जागीच मृत्यू झाला. हत्येचा हा प्रकार उघडकीस येऊ नये आणि बहिणीच्या विम्याचे 30 लाख रूपये मिळावेत म्हणून आरोपी जॉनने आपली आई आणि संगीताच्या मुलाला बोलावून संगीताला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले.

    त्यानंतर आरोपीने मुंबई-बंगळुरू महामार्गावर सयाजी हॉटेलच्या पुढे निर्मनुष्य ठिकाणी गाडीमध्ये बिघाड झाल्याचा बहाणा केला. तसेच संगीता यांच्या मुलास बोनेट उघडून समोर उभे राहण्यास सांगितले. त्यावेळी जॉनची आई लघुशंकेसाठी गेली असता, या संधीचा फायदा घेत आरोपीने बहिणीच्या अंगावर तसेच मोटारीमध्ये पेट्रोल टाकून लायटरने मोटार पेटवून दिली. त्यानंतर शॉर्ट सर्किटमुळे मोटारला आग लागली आणि त्यातच बहिणीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पण, पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने बहिणीची हत्या केल्याचे कबुल केले.

Trending