Maharashtra Crime / पुण्यात भावाकडून बहिणीची गळा आवळुन हत्या, एका गुन्हेगाराशी प्रेमविवाह केल्यामुळे होता राग

तरूणीने कुख्यात गुन्हेगार कांच्या वाघसोबत प्रेमविवाह केला होता

दिव्य मराठी वेब

Jun 23,2019 12:50:00 PM IST

पुणे- एका गुन्हेगाराशी प्रेमविवाह केल्यामुळे चुलत भावाने बहिणीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना चिंचवडच्या दळवीनगरमध्ये घडली आहे. खूनानंतर आरोपी संतोष भोंडवे स्वतः पोलिसांना शरण येऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. ऋतुजा भोंडवे असे मृत मुलीचे नाव आहे.


ऋतुजाने दीड वर्षांपूर्वी सराईत गुन्हेगार कांच्या वाघशी प्रेमविवाह केला होता. काही दिवसांपासून ऋतुजाचा सासरी वाद सुरू असल्यामुळे माहेरी आली होती. यावेळी चुलत भाऊ संतोष आणि ऋतुजामध्ये तिच्या प्रेमविवाहावरून वाद झाला. यावेळी चिडलेल्या संतोषने रागाच्याभरात दोरीच्या साहाय्याने गळा आवळून ऋतुजाचा खून केला. यानंतर पोलिस स्टेशनला जाऊन आपल्या खूनाची कबुली दिली.

X
COMMENT